Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा ?

राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. कोकणातील रायगड रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी (Heavy Rainfall) पडत आहेत. कोकणातील रायगड रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक धुळे जळगाव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्ये तर संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला. उद्या सकाळपर्यंत राज्यात ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) जाहीर केला.

Rain Update
Rain Update : पुणे जिल्ह्यात वाढला पुन्हा पावसाचा जोर

पालघर जिल्ह्यातील वसई येथे 145 मिलिमीटर पावसाचे नोंद झाले. तर वाडा आणि तलासरी मंडळामध्ये मध्यम पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील माथेरान कर्जत आणि मेरा मंडळामध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. सर्व मंडळांमध्ये कमीअधिक पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात आहे हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतेक मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

Rain Update
Rain Update : जायकवडीतून सहा तासात चार वेळा वाढविला विसर्ग

मध्य महाराष्ट्रातील नगर, धुळे, कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाने हलक्या ते मध्यम पाऊस झाला. नंदुरबार जिल्ह्यातही पावसाचा शिडकावा झाला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे 157 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर बहुतेक मंडळांमध्ये मध्यम स्वरूपाच्या तर अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात काही मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या मात्र बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर कमी होता. सातारा जिल्ह्यात आहे मात्र जोरदार पाऊस झाला नाही.

शनिवारी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी राहिला. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, नांदेड. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या मात्र जोरदार पाऊस पडला नाही. विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला मात्र पावसाचा जोर कमीच राहिला. बुलढाणा अकोला आणि वाशिम तसंच अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये काही भागात पावसाच्या सरी पडल्या. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्हात मोठ्या पावसाचे नोंद नाही. हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com