Weather Update : या भागांत जोरदार पावसाची शक्यता!

राज्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी होत आहेत.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे ः राज्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचा जोर (Heavy Rain In Thane And Konkan) कायम आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी होत आहेत. त्यामुळे नद्यानाले खळाळून वाहत आहेत. तर हवामान विभागाने (Weather Department) कोकण तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तीन दिवस जोरदार पावसाचा रेड अलर्ट (Red Alert Of Rain) जाहिर केला.

Heavy Rain
Cotton Seed : देशातील बाजारात कपाशीचे १५ टक्के अवैध बियाणे

कोकणात शुक्रवारी दुपारपर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होतेय. परिणामी पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला होता. तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी केला. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान

Heavy Rain
Kharif Sowing : धूळवाफेवर पेरणी केलेली पिके धोक्यात

कोल्हापूर जिल्ह्यात मात्र शुक्रवारी पावसाची उघडीप होती. पुणे जिल्ह्यातही सर्वत्र पावसाच्या सरी पडत आहेत. सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. तर सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, जावळी, पाटण तालुक्यात पाऊस सुरू आहे. विदर्भातही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अमरावती जिल्ह्यात ४२६ घरांची पडझड झाली, तर ११०० घरांत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.

दुसरीकडे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत हलका पाऊस झाला. येथे जोरदार पावसाची आवश्यकता आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडळांमध्ये शुक्रवारी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही ठिकठिकाणी चांगला पाऊस पडला. खानदेशात मात्र अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही.

दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही तीन दिवस रेड अलर्ट जाहिर करण्यात आला. तसेच नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उद्या जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com