Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १६) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १६) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) (Heavy Rain Yellow Alert) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Departmnet) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, डाल्टेनगंज, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, आग्नेय राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. १८) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.

Weather Update
Rain Update : घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा, विदर्भासह राज्यात हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. आज (ता. १६) कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update
Rain Update : विदर्भात पावसाची शक्यता

ठळक कमी दाब क्षेत्र कायम

वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा

(येलो अलर्ट) ः पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूर.

गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये. (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : मोखेडा ४८, पालघर ४५, जव्हार ५७, तलासरी ५९.

रायगड : कर्जत ६१, खालापूर ४०, माथेरान ९२, पनवेल ५०, पेण ४०, पोलादपूर ४०,

रत्नागिरी : मंडणगड ५०, राजापूर ४०,

सिंधुदुर्ग : सावंतवाडी ६८, वैभववाडी ५१.

ठाणे : आंबरनाथ ७२, भिवंडी ४९, कल्याण १०७, मुरबाड ६८, शहापूर ६६.

मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : चंदगड ५८, गगनबावडा ६२, राधानगरी ३२,

नाशिक : इगतपुरी ८९.

पुणे : लोणावळा कृषी ५६, वेल्हे ५९.

सातारा : महाबळेश्‍वर ६१.

विदर्भ : अमरावती : चांदूरबाजार ४५, मोर्शी ३८.

नागपूर : काटोल ४२, पारशिवनी ४१, रामटेक ५६, सावनेर ४२.

वर्धा : आष्टी ३३, खारंघा ३५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com