Weather Update : विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस शक्य

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) विदर्भात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता. २१) विदर्भातील अनेक जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालच्या उपसागरातील (Bay Of Bengal) वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) (Deep Depression In Bengal Bay) विदर्भात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता. २१) विदर्भातील अनेक जिल्हे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकले असून, पूर्वेकडील टोक बहारीच, वाराणसी, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. यामुळे विदर्भासह, मध्य आणि पूर्व भारतात ढगांनी दाटी केली आहे.

Weather Update
Heavy Rain : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात ४५५ किमींचे रस्ते खरडले

पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरूच असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २१) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

Weather Update
BBF Technology : जादा पावसातही बीबीएफवरील लागवडीची पिके जोमदार

बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाब प्रणाली जमिनीवर आली आहे. दक्षिण झारखंड आणि उत्तर ओडिशा परिसरावर असलेली ही प्रणाली वायव्येकडे सरकत आहे. आज या प्रणालीची तीव्रता ओसरण्याची शक्यता आहे. यातच आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

चौकट ----

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

तळा, लांजा, वैभववाडी प्रत्येकी ५०, माणगाव, राजापूर, माथेरान, पोलादपूर, मुरूड प्रत्येकी ४०, महाड, खेड, अंबरनाथ, चिपळूण, दापोली, म्हसळा, उल्हासनगर, ठाणे प्रत्येकी ३०.

महाबळेश्‍वर ५०, गगनबावडा, लोणावळा प्रत्येकी ४०, इगतपुरी, पौड प्रत्येकी ३०.

विदर्भ : तिरोडा ५०.

घाटमाथा : अंबोणे १५०, दावडी १४०, ताम्हिणी १२०, कोयना पोफळी ११०, शिरगाव ९०, डुंगुरवाडी ६०, कोयना नवजा ५०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com