डहाणू, पालघरमध्ये धुव्वाधार

कोकणात पावसाचा जोर; विदर्भातही हजेरी
डहाणू, पालघरमध्ये धुव्वाधार
Heavy RainAgrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय होऊ लागल्याने कोकणात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरी (Light Rain) पडल्या आहेत. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस (Heavy Rain In Palghar) झाला असून, पालघर येथे २०७ मिलिमीटर तर डहाणू येथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाल्याने पावसाची संततधार सुरू आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.

विदर्भात मॉन्सूनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जालना, उस्मानाबाद, परभणीसह मराठवाड्यातही हलक्या पावसाच्या सरी पडल्या. जून महिना उलटत आल्यानंतरही राज्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मि.मी (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : सांताक्रुझ ३६.

पालघर : डहाणू १३०, पालघर २०७, तलासरी ६८, वसई ६१.

रायगड : महाड ४०, म्हसळा ७१, पेण ५६, श्रीवर्धन ५२, सुधागडपाली ५०.

रत्नागिरी : दापोली ५७, गुहागर ७०, हर्णे ५२.

सिंधुदुर्ग : देवगड ५७, कुडाळ ५०, मालवण ६०, मुलदे (कृषी) ४९, रामेश्वर ४२, सावंतवाडी ५१, वेंगुर्ला ६५.

ठाणे : ठाणे ४१, उल्हासनगर ४३.

मध्य महाराष्ट्र :

नाशिक : हर्सूल ३०, ओझरखेडा ४०.

पुणे : लोणावळा कृषी २७, वेल्हे २५.

मराठवाडा :

जालना : भोकरदन २०.

उस्मानाबाद : उस्मानाबाद २०.

परभणी : परभणी २४, सोनपेठ २५.

विदर्भ :

भंडारा : लाखणी २२,

चंद्रपूर : बल्लारपूर ३५, चंद्रपूर ३४, गोंडपिंपरी २७, मूल ७०, राजुरा २१, सिंदेवाही २५, वरोरा २१.

गडचिरोली : अहेरी ३४, अरमोरी २९, भामरागड ३६, चामोर्शी २३, एटापल्ली २८, कोर्ची ६१, कुरखेडा ३१, मुलचेरा ३२, सिरोंचा ३५.

गोंदिया : आमगाव ४९, देवरी ३०, गोंदिया ४२, गोरेगाव ३४, सालकेसा २५, तिरोडा ४०.

नागपूर : हिंगणा २४, कळमेश्वर २२, कामठी ५२, नागपूर ६०,

यवतमाळ : पांढरकवडा २५, वणी ३२, यवतमाळ २७, झारी झामणी २३.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com