Rain Update : राज्यात पावसाने दाणादाण

राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागांत नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत बुधवारी पावसाची संततधार सुरुच होती.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात पावसाचा जोर कायम (Rain Force In Maharashtra Continue) आहे. अनेक भागांत नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत बुधवारी पावसाची संततधार (Rainfall) सुरुच होती. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत पालघर, रायगड, सातारा, पुणे, नाशिक, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. तर इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केला.

कोकणातील सर्वंच जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यताये.

Rain Update
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढला. मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु होती. बुधवारी सकाळी मात्र पावसाचा जोर वाढला. लोणावळा येथे उच्चांकी २१३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर इतर सर्वंट तालुक्यात पाऊस झाला. लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात जारदार पाऊस होत आहे. परिणामी धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास होण्याची शक्यताये. त्यामुळे इंद्रायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Rain Update
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायमये. बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाल्याचं चित्रये. काढणीयोग्य भाजीपाला शेतातच उभा आहे. सततच्या पावसामुळे काढणीत व्यत्यय येत आहे. खानदेशात जोरदार पावसाने अनेक प्रकल्प १०० टक्के भरले. गिरणा धरणातील पाण्याच्या टक्केवारीने पन्नाशी गाठली. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असल्याने जिल्हा जलमय झाला. नवापूर शहरातील रंगावली नदीकाठच्या भागातील दोनशे कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यातील सारेच मध्यम व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.

परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील १५ आणि हिंगोली जिल्ह्यातील १९ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. हिंगोलीतील चार मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त, तर दोन मंडलांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. संततधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा रस्तेमार्गांचा संपर्क तुटला. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिके पिवळी पडत आहेत.

विदर्भातील अनेक भागांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. परिणामी कमी-अधिक प्रमाणात अकरा जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्येही बुधवारी पावसाचा जोर वाढला होता. तर यवतमाळ जिल्ह्यात दहा मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीये. उमरखेड तालुक्यात पावसाची तीव्रता अधिक असल्याने बुधवारी शाळांना सुट्टी देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील दारे नसलेले एकूण १४ धरणे ओव्हर फ्लो झाले. तर चार धरणाची दारे उघडण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात मात्र पावसाने धुमाकूळ घातला. सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बारा गावे खाली करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर कायम होता. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी ते राजुरा मार्ग बंद झाला. तर इरई नदीच्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com