Heavy Rain : मोखाड्याला पावसाने झोडपले

जव्हार, मोखाडा या दोन्ही तालुक्यांमध्ये गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. संध्याकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर ढगांच्या गडगडात आणि प्रचंड वाऱ्याच्या वेगात कोसळत होता.
Heavy Rain Mokhada
Heavy Rain MokhadaAgrowon

मोखाडा : श्री गणेशाच्या आगमनाच्या (Ganesh Agaman) पहिल्याच दिवशी जव्हार, मोखाड्यात पावसाने जोरदार (Rainfall) हजेरी लावली आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. या मुसळधार पावसाने (Heavy Rain Mokhada) खोच येथील रेणुका ओलंबे या आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले आहे. घरात तिचे सासरे मधुकर अडकले होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत.

Heavy Rain Mokhada
Drought And Agriculture : दुष्काळात होरपळतेय जगाची शेती

जव्हार, मोखाडा या दोन्ही तालुक्यांमध्ये गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. संध्याकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्रभर ढगांच्या गडगडात आणि प्रचंड वाऱ्याच्या वेगात कोसळत होता. या पावसाने मोखाड्यातील खोच येथील रेणुका ओलंबे या आदिवासी महिलेचे घर कोसळले आहे.

घरामध्ये रेणुकाचे सासरे मधुकर हे अडकले होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, सुदैवाने ते बचावले आहेत; तर वादळी पावसाने मोखाड्यातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. खोचमध्ये मुसळधार पावसात कोसळलेल्या घराची माहिती येथील शिक्षक नितीन आहेर यांनी मोखाडा तहसीलदारांना दिली आहे. माहिती मिळताच तहसीलदार मयूर खेंगले यांनी पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com