Nashik Rain : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

नाशिक : जिल्हाच्या पश्चिम भागात सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत पुन्हा शुक्रवारी (ता. ९) अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : जिल्हाच्या पश्चिम भागात सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत पुन्हा शुक्रवारी (ता. ९) अतिवृष्टीची (Sinanr Heavy Rain) नोंद झाली. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसा (Crop Damage)न झाले. चांदवड तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटो, सोयाबीन (Soybean), बाजरी, मका, कांदा रोपे (Onion Seedling) याशिवाय काही भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान (Vegetable Crop Damage) झाले. सलग दुसऱ्या दिवशी पूर्व भागात अतिवृष्टीसदृश पावसामुळे पिके उद्ध्वस्त झाली.

Crop Damage
Crop Damage : शेतात मातीच उरली नाही, शेती करू कशी?

शुक्रवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक अतिवृष्टीची नोंद नाशिक तालुक्यात झाली. दिंडोरी, सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाने दाणादाण उडविली. चांदवडमध्ये गुरुवारी (ता. ८) दुपारनंतर पावसाचा जोर वाढला तर शुक्रवारी पुन्हा अतिवृष्टी झाली. दूगाव मंडलात ८९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढे, नाले व परिसरातील नद्यांना पूर येऊन पूरपाणी शिवारात शिरले. त्यामुळे भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला, टोमॅटो लागवडी सर्वाधिक बाधित झाल्या. शिवरे, ता. चांदवड येथील शेतकरी विलास धोंडगे यांनी चार एकर प्लॉटवर टॉमटो लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे ठिबक सिंचन साहित्य, मल्चिंग पेपर मातीसोबत वाहून गेला. नांदगाव तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. येथे जातेगाव परिसरात अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Crop Damage : गणेशोत्सवात शहरात धामधूम, गावशिवारे सामसूम

निफाड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये रुई, डोंगरगाव, धानोरे, गाजरवाडी, सारोळा, थडी, खेडले झुंगे, धारणगाव वीर, धारणगाव खडक या गावांमध्ये जोरदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडली. शेतातील उभे मका पीक जमिनीवर पडले. उन्हाळ व लाल कांद्याच्या रोपवाटिका पावसामुळे बाधित झाल्या आहेत. मालेगाव, सटाणा, कळवण, सिन्नर, येवला, त्र्यंबकेश्वर व देवळा तालुक्यांत मध्यम हलका पाऊस झाला.

जिल्ह्यातील १८ धरणांतून विसर्ग सुरू

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांतून विसर्ग कायम आहे. सर्वधिक विसर्ग पालखेड, भोजापूर व दारणा धरणातून सुरू आहे. त्यामुळे नांदूरमधमेश्वर धरणात पाण्याची आवक कायम असल्याने १२,२५० क्युसेक विसर्ग गोदावरीत सोडण्यात येत आहे. याशिवाय गंगापूर, आळंदी, पालखेड, करंजवन, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, नाग्यासाक्या, गिरणा या धरणांतून विसर्ग सुरू आहे.

चांदवड तालुक्यातील स्थिती

महसूल मंडळ...पाऊस (मिमी)

चांदवड...६३

दिघवद...६३

दुगाव...८९.३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com