Rain Update : उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात पावसाचा जोर

कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसाने, तसेच पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान होत आहे
Rainfall
RainfallAgrowon

पुणे : पावसाला पोषक हवामान (Favorable Weather Condition) असल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात राज्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस (Heavy Rain With Lightning) सुरूच आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत.(Monsoon Rain) सातत्याने पडणाऱ्या पावसाने, तसेच पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान (Crop Damage) होत आहे.

Rainfall
Lumpy Skin : गोठ्यांना मरणकळा ‘लम्पी स्कीन’पुढे पशुपालक हतबल

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले असून, काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. लगतच्या बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी मंडळात अतिवृष्टी झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला.

Rainfall
Eknath Shinde : मराठवाड्यासाठी भरीव निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

शेतांमध्ये पाणी घुसल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर,कपाशी,मका पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात आठ मंडळात अतिवृष्टी झाली असून, जालन्यातही अनेक भागात दमदार पाऊस झाला. बीड लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक पाऊस वगळता पावसाने उसंत घेतली होती.

Rainfall
Pm Kisan And Raju Shetty: राजू शेट्टींच्या खात्यावर पीएम किसानचे पैसे कसे जमा झाले ? | ॲग्रोवन

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पावसाने शेती पिकांची दाणादाण झाली. पिशोर व करंजखेडा परिसरात झालेल्या पावसाने अंजना, खडकी, इसम, कवडा नाला, कोळंबी, काटशेवरी नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले. नदी नाल्यांना पूर आल्याने परिसरातील कोळंबी, तांडा-भारंबा, भारंबा वाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव, भिलदरी यासह अनेक गावांचा पिशोर या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला.पिशोर, करंजखेडा भागात झालेल्या पावसामुळे अनेक भागात शेतात पाणी तुंबले आहे. पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. हिंगोली, परभणी जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

डहाणू ८०, मुरबाड ७०, अलिबाग ६०, माथेरान ५०, कर्जत ३०.

मध्य महाराष्ट्र :

चांदवड, पाचोरा, पेठ प्रत्येकी ८०, धुळे, श्रीरामपूर, नांदगाव, दिंडोरी प्रत्येकी ६०, कळवण, भडगाव प्रत्येकी ५०, मालेगाव ४०, येवला ३०, मुल्हेर, निफाड, त्र्यंबकेश्वर, गिरणा धरण, अंमळनेर, सटाणा, हर्सूल प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

सोयगाव ९०, कन्नड ७०, जाफराबाद, भोकरदन, खुलताबाद प्रत्येकी ५०, कळमनुरी ४०.

विदर्भ :

सिंदखेडराजा, यवतमाळ प्रत्येकी ४०, देऊळगाव राजा, मेहकर, बुलडाणा, लोणार, महागाव, आर्णी, नांदगाव काझी प्रत्येकी ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com