Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

२७ गावांचा संपर्क तुटला, करूळ घाटात घाट रस्ता खचला
Rain Update
Rain UpdateAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कायम असून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सकाळपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain In Sindhudurg) सुरू आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. करूळ घाट रस्ता देखील खचला असून तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत (River Water Level) देखील मोठी वाढ झाली आहे.

Rain Update
Soybean : सोयाबीन, कापूस, हळदीत उतरता कल

जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल सायकांळी जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला पावसाने झोडपून काढले. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या भागातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटरस्ता खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहने घाटरस्त्यांमध्ये अडकून पडली होती. घाटरस्त्यांच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाटमार्गे वळविली आहे.

दरम्यान आज पहाटेपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तेरेखोल नदी, गडनदी, शुकनदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही राज्यमार्गावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा जोर सायकांळपर्यत कायम राहिल्यास खारेपाटणमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com