Rain Update : वऱ्हाडात संततधार पावसाचा जोरदार तडाखा

काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोमात परतला असून गेल्या काही तासांपासून संततधार कोसळत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

अकोला ः काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोमात (Rain) परतला असून गेल्या काही तासांपासून संततधार कोसळत आहे. कवठळ (जि. बुलडाणा) मंडळात सर्वाधिक ११०.५ मिलिमीटर पाऊस (Rainfall In Varhad) झाला. सोबतच इतरही काही मंडळांमध्ये तुफान पाऊस (Heavy Rain) झाला आहे. हा पावसाचा जोर असाच कायम राहिला तर आता पिकांच्या नुकसानीची (Possibility Of Crop Damage) शक्यता वाढणार आहे.

Rain Update
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

रविवारी (ता. १७) सायंकाळपासून या विभागातील तीनही जिल्ह्यांमध्ये पावसाचे पुनरागमन झाले. सोमवारी (ता. १८) सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. या तालुक्यांतील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. जळगाव जामोद तालुक्यात जळगाव ६८, जामोद ६१, वडशिंगी ९०.३, संग्रामपूर ७४.८, पातुर्डा ९३, कवठळ ११०.५, शेगाव ६४.५, मनसगाव ८८.३ असा जोरदार पाऊस झाला. अकोला जिल्हयात तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तर वाशीम जिल्ह्यात वाशीम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड अशा सर्वच तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाला आहे.

Rain Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

बाळापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बाळापूर येथील महेश नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नद्यांच्या पुराच्या पाण्याचा शहराला वेढा बसला. बाळापूर शहरात येणारे सर्व मार्ग बंद झाल्याने बस सेवा प्रभावित झाली होती. तालुक्यातील ८४ गावांचा संपर्क तुटला आहे. बाळापूर नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत होते. त्यामुळे तातडीने पारस प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती बाळापूर तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन यांनी दिली आहे.

पारस प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पुलावरून काही प्रमाणात पाणी कमी होत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. मनारखेड धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे बाळापूर शहरातील मन नदीच्या पाण्याची पातळी खाली जात आहे. शहरातील सर्व रस्ते सुरू झालेले आहेत. लोकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. नदी काठच्या लोकांना सावध राहावे, असे आवाहन तालुका प्रशासनाचे वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यानी केले आहे.

जोरदार पाऊस झालेली मंडळे

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव ६८, जामोद ६१, वडशिंगी ९०.३, संग्रामपूर ७४.८, पातुर्डा ९३, कवठळ ११०.५, शेगाव ६४.५, मनसगाव ८८.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com