Rain : विदर्भात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित

विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
Vidarbh Rain
Vidarbh RainAgrowon

नागपूर ः विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain In Vidarbh) जनजीवन विस्कळित झाले आहे.अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्‍यात चुडामणी नदीचे (Chudamani River Overflow) पाणी नदीकाठालगतच्या वस्त्यांमध्ये शिरल्याने एक हजारपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराच्या (Flood) पाण्यात वाहून गेल्याने रवाळा येथील एका युवकाचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिक जनावरे दगावल्याची (Animal Died Due To Flood) भीती वर्तविली जात आहे. यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांतही स्थिती गंभीर झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील वरूड परिसरातून चुडामणी नदी वाहते. या नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशात असून त्या भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या नागठाणा-१ व २ दोन हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आणि नदीला पूर आला. परिणामी नदीकाठालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने एक हजारांवर नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. रवाळा येथील अंकुश धुर्वे हा युवक पाण्यात वाहून गेला. त्याचा मित्र त्याला वाचविण्यासाठी गेला असता त्याची देखील दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. सातनूर येथे पाच युवक जीवना नदीच्या काठावर अडकले होते.

Vidarbh Rain
Vidarbh Flood : विदर्भातील पुराला जबाबदार कोण?

गोठ्यातील जनावरे सोडण्यासाठी गेलेल्या या युवकांची प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सुटका केली. सातनूर व मिरची प्लॉट परिसरातील गोठ्यातील ५० पेक्षा अधिक जनावरे वाहून गेल्याची भीती वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला सातुर्णा ते मांगरुळी रस्ता वाहून गेला. शहरातील काही छोटे मोठे पुल या पुरामुळे क्षतीग्रस्त झाले आहेत. पूरग्रस्तांची वरुडबाजार समितीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसराला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार देवेंद्र भुयार, बाजार समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे.

Vidarbh Rain
Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. बोरी अरब येथील अडाण नदीच्या पुलावरून पाणी असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्ग रविवार (ता.७) रात्री ९ वाजतापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कपाशी, सोयाबीन पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदील झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्याने आर्वी-देऊरवाडा रस्ता बंद आहे. बोर प्रकल्पातील पाण्याची पातळी सातत्याने वाढती असल्याने ९ दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बोरखेडी कला येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. काही घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने या कुटुंबीयांना प्रशासनाने सुरक्षीतस्थळी हलविले आहे. हिंगणघाट तालुक्‍यात पोथरा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने सावंगी-हेटी रस्ता बंद आहे. यशोदा नदीच्या पुलावरून देखील पाणी वाहत असून भगवा ते चानकी मार्ग बंद आहे. हिंगणघाट-पिंपळगाव, देवळी तालुक्‍यातील सरुळ, आर्वी-तळेगाव हे रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही स्थिती विदारक आहे. पावसामुळे या भागात काही रस्ते बंद असून त्यामध्ये गोंडपिंपरी तालुक्‍यातील पोडसा मार्गाचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील चुलहारडोह गावानजीक असलेल्या जंगलातील तलाव फुटल्याने धनेगाव येथील १५ घरात पाणी शिरले आहे.

गेल्या २४ तासातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)

अकोला ः १०.८

अमरावती ः २८.६

बुलडाणा ः ६.०

ब्रम्हपूरी ः ४६.६

गडचिरोली ः ८३.४

गोंदिया ः २२

नागपूर ः १०८.७

वर्धा ः १००.४

यवतमाळ ः ६१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com