Rain Update : घाटमाथ्यासह विदर्भात मुसळधार

मॉन्सूनच्या पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात पावसाने दणका दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.
Vidarbh Rain Update
Vidarbh Rain Update Agrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसाचे पुनरागमन (Monsoon Rain Comeback) झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात पावसाने दणका (Rain Hit Various Region In Maharashtra) दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने (Heavy Rain) अक्षरश: झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी २०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain In Vidarbha) पडला असून, मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अर्जुना, कोदवली, काजळी, भारजा नद्यांना पूर आला असून, जगबुडी, वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडणगड, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्‍वर लांजा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. करूळ घाट रस्ता देखील खचला असून तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.

Vidarbh Rain Update
Fertilizer : ‘एमओपी, ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भाग, पुणे जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, चांदोलीतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने वारणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात पावसाची कोसळधार सुरूच आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर शेतजमिनीमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होणार आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. तर वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पारवा, साखरा गटात तासभर मुसळधार पडला.

Vidarbh Rain Update
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जालना शहर, लातूर जिल्ह्यातील हेर मंडळात अतिवृष्टी झाली. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सततच्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी लाखो हेक्टर जमीन चिभडली आहे. वाफसा नसल्यामुळे आंतरमशागतीची कामे ठप्प झाली आहेत.

राज्यात सोमवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : लांजा २९०, श्रीवर्धन २५०, दोपोली २२०, म्हसळा, चिपळूण, गुहागर प्रत्येकी २१०, मंडणगड २००, तळा, हर्णे वाकवली प्रत्येकी १८०, रत्नागिरी, रोहा, प्रत्येकी १५०, संगमेश्वर, कुडाळ प्रत्येकी १४०, अंबरनाथ, जव्हार प्रत्येकी १३०, मानगाव, वैभवावाडी प्रत्येकी १२०, पोलादपूर, मोखेडा, खेड, कणकवली प्रत्येकी ११०, मरुड, उल्हासनगर प्रत्येकी १००.

मध्य महाराष्ट्र :

गगनबावडा १९०, महाबळेश्वर १४०, इगतपुरी १३०, आजरा, राधानगरी, चंदगड प्रत्येकी ११०, शाहूवाडी ९०, दिंडोरी, पन्हाळा, येवला प्रत्येकी ७०, गारगोटी, घोडेगाव प्रत्येकी ६०, कागल, कोल्हापूर, वेल्हे, तळेगाव, त्र्यंबकेश्वर, जुन्नर, ओझरखेडा ५० प्रत्येकी ५०.

मराठवाडा :

हिंगोली ६०, जालना, सेनगाव, आंबेजोगाई प्रत्येकी ५०, पैठण, धारूर प्रत्येकी ४०, भोकर, उदगीर, कंधार, चाकूर, शिरूर कासार, नांदेड, परळी वैजनाथ, किनवट, वसमत, माहूर, औंढा नागनाथ प्रत्येकी ३०.

विदर्भ :

उमरेड २१०, मुलचेरा १६०, एटापल्ली, मूल, नागपूर प्रत्येकी ११०, मारेगाव, गडचिरोली, पारशिवणी, सेलू प्रत्येकी १००, पवनी, मौदा, वरूड, मोहाडी, काटोल, चामोर्शी, हिंगणा, वर्धा प्रत्येकी ९०, कळंब, झारी झामणी, राळेगाव, खारंघा, नरखेडा, हिंगणघाट, सावनेर, पोंभुर्णा प्रत्येकी ८०, पांढरीकवडा, घाटंजी, कामठी, देवणी, कुही, कळमेश्वर, तिरोडा, आर्णी, सिंदेवाही प्रत्येकी ७०, सावळी, समुद्रपूर, धानोरा, वणी, वरोरा प्रत्येकी ६०.

- सिंधुदुर्गमध्ये मुसळधार, २७ गावांचा संपर्क तुटला

- रत्नागिरीतील काजळी, अर्जुना, कोदवली नद्यांना पूर

- जगबुडी, वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

- सातारा पश्चिम भागात पाऊस, पुणे जिल्ह्यात हजेरी

- परभणी, हिंगोली जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस

- कोल्हापूर संततधार, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू

- पंचगंगेच्या पातळीत वाढ, चांदोलीतून पाण्याचा विसर्ग

- अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात संततधार

- वाशीम : मानोरा तालुक्यात अतिवृष्टी, नदी नाल्यांना पूर

- यवतमाळ : पारवा, साखरा गटात तासभर मुसळधार

- अमरावती ः वरुड तालुक्यात १ हजार नागरिकांचे स्थलांतर

- सोलापूर- उजनी धरण ८६ टक्क्यांवर

- लातूर जिल्ह्यातील हेर येथे अतिवृष्टी

- कोल्हापूर : दूधगंगा धरणातून १४०० क्यूसेक विसर्ग सुरू

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com