Crop Damage : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईसाठी ५२९ कोटींचा निधी

यवतमाळ जिल्ह्यास शासनाने वाढीव दराने ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये निधी आणि खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधित झालेल्या शेत जमिनीसाठी ६ कोटी ५ लक्ष १६ हजार रुपये इतका निधी दिला आहे.
Wet Drought
Wet DroughtAgrowon

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मध्ये जिल्ह्यात ३ लक्ष ८९ हजार ५५८ हेक्टर शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. त्याकरिता यवतमाळ जिल्ह्यास शासनाने वाढीव दराने ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये निधी आणि खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधित झालेल्या शेत जमिनीसाठी (Agriculture Land Wash Away) ६ कोटी ५ लक्ष १६ हजार रुपये इतका निधी दिला आहे. जिल्ह्यात डिसेंबर २०२१ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट (Hailstorm) होऊन राळेगाव, बाभूळगाव, दिग्रस, तालुक्यांतील ११ हजार १०० हेक्टर शेतपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते,

Wet Drought
Wet Drought : पावसामुळे भातशेती संकटात ?

त्याकरिता जिल्ह्याची सदरची मागणी प्रलंबित होती, त्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्याला ११ कोटी ४३ लक्ष ६२ इतका निधी प्राप्त झाला आहे. ऑगस्ट मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तसेच जिल्ह्यात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यासाठी देखील लवकरच शासनाकडून शेतकऱ्यांना मदत प्राप्त होईल, याबाबत शेतकऱ्यांनी आश्वस्त राहावे असेही मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Wet Drought
Crop Damage Survey : सोलापूर जिल्ह्यात जुन्याच निकषानुसार पंचनामे सुरु

राज्य शासनाने एका शासन निर्णयान्वये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मंजूर केली आहे. यानुसार यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ७८ हजार ३०१ शेतकऱ्यांना ३ लाख ८९ हजार ४४२ हेक्टर जिरायती बाधित क्षेत्रासाठी, ११६ शेतकऱ्यांना ७९ हेक्टर आश्वासित सिंचनाखालील बाधित क्षेत्रासाठी, ४४ शेतकऱ्यांच्या ३६.८५ हेक्टर बहुवार्षिक पिकाखालील बाधित क्षेत्रासाठी

असे एकूण ३ लाख ७८ हजार ४६१ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८९ हजार ५५८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपये निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत मंजूर करून विभागीय आयुक्त यांना निधी वितरणाचे आदेश देण्याचे सूचित केले आहे.

याशिवाय शेतजमीन खरडून किंवा वाहून गेल्यामुळे ९३९.७८ हे.आर. क्षेत्राच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ३७ हजार ५०० प्रमाणे ३ कोटी ५२ लाख ४२ हजार रुपये व शेतजमिनीवर ३ इंचापेक्षा अधिक जाडीचा गाळ साचल्याने बाधित झालेल्या २ हजार ७१ हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी ५२ लाख ७४ हजार असे एकूण ३ हजार ११.४२ हे. क्षेत्रासाठी ६ कोटी ५ लाख १६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com