Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

कोकणातील (Kokan) बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम सरी पडल्या. तर काही भागांत जोरदार सरी झाल्या.
Weather Update
Weather UpdateAgrowon

राज्यात ठिकठिकाणी पाऊस हजेरी लावतोय. मात्र पावसाचं प्रमाण कमी आहे. बुधवारी राज्यातील बहुतांशी भागांत पावसाचं वातावरण होतं. हवामान विभगानं उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केलाय.

कोकणातील (Kokan) बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम सरी पडल्या. तर काही भागांत जोरदार सरी झाल्या. मात्र जोरदार पाऊस सर्वत्र नव्हता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मुसळधार सरी झाल्या. तर इतर ठिकाणी विजांसह पावसाचा शिडकावा झाला.

मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत पावसाच्या सरी झाल्या. तर तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. काही मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या. तर सोलापूर, सांगली, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र या जिल्हांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं.

मराठवाड्यातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. औरंगबाद, जालना आणि लातूर जिल्ह्यात अनेक मंडळांमध्ये पावसाची भूरभूर सुरु होती. तर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, माकणी, जेवळी, गोविंदपूर, इटकळ, ढोकी या मंडळांमध्ये पाऊस झाला. तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात अनेक मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

विदर्भातही सर्वंच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी झाल्या. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांतील काही मंडळात पावसाचा शिडकावा झाला. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. तर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यातील बहुतांशी मंडळांत पाऊस झाला. पावसाचा जोर कमी असला तरी सर्वच भागांमध्ये कमी जास्त पाऊस झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकणातील काही जिल्हे, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com