Rain Update : राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा अंदाज

राज्यात बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली. तर काही भागांत हलक्या ते जोरदार सरी बरसल्या.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली. तर काही भागांत हलक्या ते जोरदार सरी (Heavy Rain) बरसल्या. दिवसभरातून अनेकदा ढग दाटून (Cloudy Weather) येत आहेत. मात्र पावसाचा जोर कमीच आहे. हवामान विभागानं (weather Department) उद्या सकाळपर्यतं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिलाय.

Rain Update
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

शुक्रवारी राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी पडल्या. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर इतर भागांत ढगाळ तावावरणासह हलका पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काही भागांत पावसाचा जोर अधिक होता. मात्र कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या.

पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धरणक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी होत आहेत. मात्र सार्वत्रिक पाऊस झाला नाही. जिल्ह्यात ऊनसावलीचा खेळ सुरु होता. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव, खटाव, वाई, माण, फलटण, जावली, सातारा, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा व कोळगाव मंडलात अतिवृष्टी झाली. याशिवाय जिल्ह्यातील बारापेक्षा अधिक मंडलात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिक जिल्ह्यातही काही भागांत पावसाने हजेरी लावली होती.

Rain Update
Rain Update : राजूरला ४२ मिलिमीटर पाऊस

खानदेशात काही भागांत हलका पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्या. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात काही भागांमध्ये मध्यम पाऊस झाला. काही मंडळांत जोरदार पावसाची नोंद झाली. मात्र अनेक भागांमध्ये शुक्रवारी ऊन पडले होते.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांत तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात, तर विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com