Rain Update : अनेक भागांना जोरदार पावसानं झोडपलं

राज्यात मंगळवारी बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात मंगळवारी बहुतांश भागांत पावसाने (Rainfall) हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक मंडळात जोरदार पाऊस (Heavy Rain In Marathawada And Vidarbh) झाला. तर काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट (Rain Red Alert) जारी केलाय. तर इतर भागांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली.

राज्यात मंगळवारी बहुतांश भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने मंगळवारीही धुमाकूळ घातला. किनारी भागात वादळी वारे वाहत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी, बावनदी, काजळी, अर्जुना नदीची पाणीपातळी कमी झाली होती. चांदेराई बाजारपेठेत दोन फुटांपर्यंत पुराचे पाणी तसेच होते. रायगड जिल्ह्यातही अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्यात म्हसला मंडळात १८८ मिमी. तर मानगाव मंडळात १६३ मिमी. पाऊस झाला.

Rain Update
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. राधानगरी येथे १९७ मिमी. पावसाची नोंद झाली. तर गगणबावडा येथे १७७ मिमी, आणि शाहुवाडी मंडळात १४५ मिमी. पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील लोणावळं येथं १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय वेल्हे, पौड, भोर, जून्नर तालुक्यात अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. कडेगाव, मिरज, वाल्हा या भागांत पाउस अधिक होता. सातारा जिल्ह्यातील महामबळेश्वर येथे १९२ मिलीमीटर पाऊस झाला. पाडेगाव, जावळी आणि वाई तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.

Rain Update
Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नदी, नाले फुगल्याने काही भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुरात वाहून गेल्याने तसेच इतर अपघाताच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात काही मार्गावरील वाहतूक ही प्रभावीत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी मार्ग बंद करण्यात आला आहे. शिवणी पोटफोडी नदीच्या पुलावर पाणी असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात बेंबळा नदीच्या पुलावरून पाणी असतानाही नदीपात्रात ट्रॅक्टर टाकण्यात आला.

मराठवाड्यातही अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

खानदेशात अनेक भागांत मध्यम ते जोरदार सरी पडल्या. हलक्या, मुरमाड जमिनीतील पिकांना पावसाने जीवदान मिळाले. तर काळ्या कसदार जमिनीत सखल भागात पाणी साचून पिकांची हानी होणार आहे. तसेच काही भागात नाल्याकाठी शेतकऱ्यांची जमीनही खरडून गेली आहे.

दरम्यान हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तसंच कोल्हापूर, सातारा, नाशिक, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com