दक्षिण ओडिशाला मुसळधार पावसाने झोडपले

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी (ता. ८) दक्षिण ओडिशात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने सखल भागात नद्यना पूर आला आहे.
Oddisa Rain
Oddisa RainAgrowon

भुवनेश्‍वर (वृत्तसंस्था) ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सोमवारी (ता. ८) दक्षिण ओडिशात मुसळधार पावसाने (Heavy Rain Oddisa) थैमान घातल्याने सखल भागात नद्यना पूर आला आहे. नबरंगपूर, कोरापुट, कालाहंडी, मलकानगिरी, गंजम, गजपती आणि कंधमाल या जिल्ह्यांना कमी दाबाच्या आणि सक्रिय मॉन्सूनच्या (Monsoon) जोरदार ते अति मुसळधार पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे शेती (Agriculture) आणि रस्ते जलमय झाले.

गंजममधील छत्रपूरला ९५.२ मिमी पावसाने झोडपले. पापडहंडी येथे तुरी नदीचे पाणी घरांमध्ये शिरले. नबांगपूरचे जिल्हाधिकारी कमल लोचन मिश्रा यांनी पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला बाधित लोकांसाठी मदतीची व्यवस्था करण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. पापडहंडीजवळ तुरीवरील पूल पाण्याखाली गेल्याने राज्य महामार्ग तुटला. वाहनांना येण्यास परवानगी देण्यापूर्वी पुलाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

Oddisa Rain
Fertilizer : ‘एमओपी, ‘पीडीएम’च्या वापरात गफलत नको

श्रबणामधील बारगढ जिल्ह्यातील नरसिंहनाथ मंदिरात गेलेले अनेक कौडिया भाविक ओढ्याच्या जोरदार प्रवाहात अडकले होते. त्यांनी एकमेकांना धरून मानवी साखळी केली आणि धोकादायक परिस्थितीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. गजपती जिल्ह्यातील काशीनगर येथे वंशधारा नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत होती. कंधमाल येथील नदीत तात्पुरता पूल वाहून गेला. मंगळवार (ता. ९) सकाळपर्यंत गजपती, गंजम आणि कंधमाल जिल्ह्यांतील काही ठिकाणी २०४ मिमीपेक्षा जास्त अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मंगळवारी बारगढ, संबलपूर, अंगुल आणि केओंझारमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे असुरक्षित डोंगराळ भागात अचानक पूर, भूस्खलन किंवा चिखल होऊ शकतो आणि प्रमुख रस्ते आणि घरांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कटक, बोलंगीर, बौध, बालासोर, भद्रक, ढेंकनाल, देवगड, झारसुगुडा, जाजपूर, जगतसिंगपूर, केंद्रपारा, मयूरभंज, सुंदरगड आणि सुबर्णपूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा नारंगी इशाराही हवामान विभागाने जारी केला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ताशी ४५ ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना गुरुवारपर्यंत किनाऱ्यावरून न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Oddisa Rain
Cotton Sowing: अतिसघन कापूस लागवड तंत्र कसं आहे ?

चंबामध्ये ढगफुटी ः पिकांचे नुकसान

चंबा, हिमाचल प्रदेश (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील कंदावर गावात मुसळधार पावसादरम्यान ढगफुटी होऊन एकाचा मृत्यू झाला आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाच ते सहा घरांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, घरे रिकामी करण्यात आली आहेत. पावसामुळे शेतजमिनीचे तसेच शेले-कंदावार गटारावरील पुलाचे मोठे नुकसान झाले.

गुलेल गावालाही उद्रेकाचा फटका बसला. चंबा-टेस्सा रस्ता रोखण्यात आला. राज्य आपत्कालीन कृती केंद्र या घटनेनंतर बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलचे (एनडीआरएफ) पथकदेखील जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे. हिमाचलमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

केंद्रीय पथके आंध्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करणार

अमरावती (वृत्तसंस्था) ः आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे ३५०० हेक्टरवरील शेती पिकांचे आणि ८७०० हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले. ५५६ किमी लांबीच्या रस्त्यांचेही नुकसान झाले. पूरपरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. केंद्र सरकारची दोन आंतर-मंत्रालयीन पथके बुधवारी (ता. १०) आणि गुरुवारी (ता. ११) अल्लुरी सीताराम राजू, एलुरु आणि बी. आर. आंबेडकर कोनासीमा या नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

अलीकडेच गोदावरी नदीला आलेल्या पुराचा तडाखा या जिल्ह्यांना बसला आहे. बी. आर. आंबेडकर कोनासीमा, अल्लुरी सीताराम राजू, एलुरु, पश्‍चिम गोदावरी आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या वस्त्या पाण्याखाली गेल्याने पुनर्वसन केंद्रात दाखल करावे लागले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एसडीएमए) व्यवस्थापकीय संचालक बी. आर. आंबेडकर यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयातील आर्थिक सल्लागार (एनडीएमए) रवीनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय केंद्रीय पथक असेल. एक पथक १० ऑगस्ट रोजी अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याला भेट देईल, तर दुसरे एलुरु जिल्ह्याचा दौरा करेल. ११ ऑगस्ट रोजी, पथके बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्याला भेट देतील आणि पुराच्या नुकसानीचे मूल्यांकन करतील. आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार, ११ ऑगस्टला संध्याकाळी ही पथके मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांची भेट घेणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com