Rain Alert: पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

अरबी समुद्रात (Arabian Sea) गुजरातच्या (Gujrat)किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत.
Rain Alert
Rain AlertAgrowon

पुणे : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला असून, उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडत आहे. आज (ता. १८) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आदी पूरक प्रणालीमुळे राज्यात चांगला पाऊस झाला. मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला. मराठवाड्यातही (Marathvada) पावसाची उघडीप दिली.

Rain Alert
Solar Energy: शृंगारवाडी गावाचा सौरऊर्जा पॅटर्न

आज (ता. १८) पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित विदर्भासह, पूर्व मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे.

तीव्र कमी दाब क्षेत्र ओमानकडे सरकतेय

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. मॉन्सूनचा (Monsoon) आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

गोंदिया, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, वाशीम, चंद्रपूर , भंडारा.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली. नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com