दक्षिण कोकणात जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता

उर्वरित राज्यात वादळी पावसाचा इशारा
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आजपासून (ता. ११) जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागातही वादळी वारे, मेघगर्जना विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण उत्तर प्रदेश पासून पश्चिम आसामपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेशपासून आंध्रच्या किनारपट्टीपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्रसापाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

पावसाळी हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भातील उष्ण लाट कमी झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३५.३, धुळे ४१.०, जळगाव ४०.७, कोल्हापूर ३३.६, महाबळेश्वर २५.६, नाशिक ३६.३, निफाड ३६.६, सांगली ३४.८, सातारा ३३.५, सोलापूर ३५.२, सांताक्रूझ ३५.२, डहाणू ३४.८, रत्नागिरी ३२.६, औरंगाबाद ३८.६, परभणी ३४.७, नांदेड ४१.०, अकोला ४२.९, अमरावती ४२.०, बुलडाणा ३९.४, ब्रह्मपूरी ४३.२, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४४.५, नागपूर ४२.९, वाशीम ४०.०, वर्धा ४३.१, यवतमाळ ४१.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com