Rain Update : जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा दमदार सरी

मागील चार ते पाच दिवसांपासून भात पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मावळ तालुक्यात ७७.३७ मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यापाठोपाठ वेल्हा तालुक्यात ६८.५० मिलिमीटर पाऊस पडला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाच्या अधिक सरी (Heavy Rainfall) बरसत असून लोणावळ्यात दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस (Rain Update) पडला. येथे १४६.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे (Department Of Agriculture) झाली असून पूर्व भागातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर भागांत कमी पाऊस पडला.

Rain Update
पेण ः भातशेती नुकसानीचे पंचनामे होणार

मागील चार ते पाच दिवसांपासून भात पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मावळ तालुक्यात ७७.३७ मिलिमीटर पाऊस पडला असून, त्यापाठोपाठ वेल्हा तालुक्यात ६८.५० मिलिमीटर पाऊस पडला. मुळशी तालुक्यात ५८.१७ मिलिमीटर पाऊस पडला. भोर तालुक्यामध्ये २१.५० मिलिमीटर, खेड तालुक्यामध्ये २०.७८ मिलिमीटर, तर जुन्नर तालुक्यामध्ये १८.११, पुणे शहरात १२.६५, हवेली तालुक्यामध्ये ११.३०, आंबेगाव तालुक्यामध्ये ८.४०, पुरंदर तालुक्यामध्ये ६.५७, शिरूर तालुक्यामध्ये ५.४६, दौंड तालुक्यामध्ये ४.१३, तर बारामती तालुक्यामध्ये १.३८ मिलिमीटर पाऊस पडला. तर इंदापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळत असून खरीप पेरण्यांना वेग आला आहे.

Rain Update
Rain Update : राज्यात कुठे झाला धुव्वांधार पाऊस?

लोणावळ्यापाठोपाठ कार्ला मंडळात १२९.० मिलिमीटर पाऊस पडला. वेल्ह्यातील पानशेत मंडळात ९२.० मिलिमीटर, तर मुळशीतील माले मंडळात ९१.० मिलिमीटर पाऊस पडला. इतर काही भागातही पावसाचा जोर अधिक होता. हवेलीतील केशवनगर, थेऊर, खेड, कळस, हडपसर, वाघोली, भोरमधील किकवी, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, ओतूर, खेडमधील पिंपळगाव, आंबेगावमधील घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर येथे पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. तर शिरूरमधील टाकळी, वडगाव, मलठण, तळेगाव, शिरूर, बारामतीतील बारामती, पणदरे, सुपा, मोरगाव, इंदापुरातील निमगाव, सणसर, दौंडमधील पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, दौंड, पुरंदरमधील कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, वाल्हा परिसरांतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

तसेच, पुरंदरमधील राजेवाडी, शिरूरमधील न्हावरा, रांजणगाव, बारामतीतील माळेगाव, वडगाव, लोणी, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, अंथुर्णे, दौंडमधील देऊळगाव राजे, रावणगाव या भागांत ढगाळ वातावरण होते.

गुरुवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

हवेली - पुणे शहर १६.३०, कोथरूड २४.०, खडकवासला १७.०, भोसरी १९.०, चिंचवड २८.०,

मुळशी - पौड ६१.०, घोटावडे ६०.०, थेरगाव ३२.०, मुठे ६७.०, पिरंगुट ३८.०

भोर - भोर १६.०, भोलावडे ३२.०, नसरापूर २९.०, वेळू २३.०, आंबवडे २८.०, संगमनेर २०.०, निगुडघर १९.०

मावळ - वडगाव मावळ ४४.६०, तळेगाव ४६.०, कार्ले ५५.०, खडकाळा ८१.०, शिवणे ४०.०

वेल्हा - वेल्हा ७४.०, विंझर ६७.०, आंबवणे ४१.०

जुन्नर - जुन्नर ३८.०, राजूर ४५.०, डिंगोरे १८.०, आपटाळे ४०.०,

खेड - वाडा ३८.०, राजगुरुनगर १५.०, कुडे २२.०, पाईट ३५.०, चाकण १०.०, आळंदी १३.०, कन्हेरसर १३.०, कडुस ३६.०

आंबेगाव - आंबेगाव २१.०,

शिरूर - कोरेगाव १५.०, पाबळ १०.०,

पुरंदर - सासवड १२.०, भिवंडी २१.०,

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com