Rain : कोणत्या भागात जोरदार पावसाचा इशारा?

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ मंडलांत पाऊस झाला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्यात काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी (Rainfall) पडत आहेत. तर मराठवडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरी (Heavy Rain) झाल्या. तर इतर भागांत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील ३९ मंडलांत पाऊस झाला. जालना जिल्ह्यात ४० मंडलांत तर लातूर जिल्ह्यातील १५ मंडलांत तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ मंडलांत हलक्या सरी पडल्या. नांदेड जिल्ह्यात काही मंडळात पावसाच्या जोरदार सरी झाल्या. तर हिंगोली जिल्ह्यात तूरळक ठिकाणी पाऊस झाला. परभणीत काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर इतर भागांत हलका पाऊस पडला.

Heavy Rain
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

विदर्भातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांत जोरदार सरी झाल्या. तर इतर भागांत हलका पाऊस होता. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक मंडळांत पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता तर अनेक भागांत पावसाची भूरभूर सुरु होती. वर्धा, यवतमाळ, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी होत आहेत. मात्र सार्वत्रिक जोरदार पाऊस नाही. वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस होतोय.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांत पावसाचा जोर वाढला होता. काही मंडळांत जोरदार पावसाने हजेरी लावली. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही भागांत पाऊस पडतोय. तर सातारा जिल्ह्यातही हलक्या सरी होत आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यभरात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली. बहुतांशी कोकण, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com