Weather Update : तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा

राज्यात बहुतांशी भागांत पावसाची उघडीप कायम आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मात्र पावसाचा जोर कमीच आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्यात बहुतांशी भागांत पावसाची (Rain Update) उघडीप कायम आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मात्र पावसाचा जोर (Rain Intensity) कमीच आहे. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिलाय.

Heavy Rain
Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

कोकणात काही भागांमध्ये हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या सरी झाल्या. मात्र पावसाचा जोर कमीच होता. तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. मुसळधार पाऊस नसला तरी पावसाची भूरभूर अनेक ठिकाणी सुरु होती.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात काही वेळ जोरदार सरी पडल्या. तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत पावसाची उघडीप कायम होती.

Heavy Rain
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप कायम होती. तर काही भागांत विजांसह हलक्या ते मध्यम सरी पडल्या. उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही मंडळात हलक्या सरी पडल्या. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरीही झाल्या. मात्र जोरदार पाऊस सर्वत्र नव्हता. तर मराठवाड्यातील इतर भागांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. बऱ्याच भागात उन्हाचा चटका जाणवत होता.

विदर्भातील पूर्व भागात पावसानं हजेरी लावली. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती कायम होती. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस झाला. मात्र हा पाऊस सार्वत्रिक नव्हता. तसच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ऊन पडले होते.

हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांतही विजांसह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशा अंदाज व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com