Weather Update : पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (ता. २०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) (Deep Depression In Bay Of Bengol ) विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. आज (ता. २०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain Vidarbh) इशारा (ऑरेंज अलर्ट) (Rain Orange Alert) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या.पायथ्याकडे सरकले आहे. पूर्वेकडील टोक आज (ता. २०) दक्षिणेकडे येण्याचे संकेत आहेत. पाकिस्तान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Update
Rain : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आजपासून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणासह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली

वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळी प्रणालीत (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले आहे. ओडिशातील बालासोरपासून २००, दिघापासून १४० किलोमीटर पूर्वेकडे तर पश्चिम बंगालमधील सागर बेटांपासून १०० किलोमीटर आग्नेयेकडे या प्रणालीचे केंद्र आहे. ओडिशातील बालासोर आणि पश्चिम बंगालमधील सागर बेटांजवळ ही प्रणाली जमिनीवर येणार आहे. पुढे ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत. जमिनीवर येताच या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : माथेरान, रत्नागिरी, राजापूर, जव्हार प्रत्येकी ३०.

....

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६०, इगतपुरी ४०, महाबळेश्वर, लोणावळा, धरणगाव प्रत्येकी ३०.

.......

घाटमाथा : अंबोणे १७०, दावडी १६०, शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी ७०, कोयना (नवजा) ५०.

.......

विदर्भ : सालकेसा, आमगाव प्रत्येकी ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com