Weather Update : पश्चिम विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

पूर्व किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकल्याने विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : पूर्व किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकल्याने विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पाऊस कोसळत (Heavy Rain In Vidarbh) आहे. आज (ता. १९) पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast In West Vidarbh) आहे. तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे, कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी (ता. १८) विदर्भाकडे सरकले, यातच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. विदर्भात रविवारपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाची संततधार वाढली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती.

Weather Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

आज (ता. १९) विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसह उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

कमी दाब क्षेत्र निवळतेय

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकत आहे. या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओडिशा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अमरावती, अकोला.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, बुलडाणा, वर्धा.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

औरंगाबाद, जालना, यवतमाळ, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com