Weather Update : कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा ?

राज्यातील अनेक मंडळांमध्ये आज पावसानं हजेरी लावली. तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हवामान विभागानं आज राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणेः राज्यातील अनेक मंडळांमध्ये आज पावसानं (Rainfall) हजेरी लावली. तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला. हवामान विभागानं (Weather Department) आज राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast) व्यक्त केला.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास मागील सात दिवसांपासून थांबलेला आहे. सध्या माॅन्सूनची सीमा उत्तरकाशी, नजिबाबाद, आग्रा, ग्वालिय, रतलाम, भरूच आणि लाॅंग या भागात आजही कायम होती. तर राज्यात आज अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली.

तर बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा जास्त होता. मात्र या पावसानं खरिपातील काढणीला आलेल्या भाताचं नुकसान वाढलंय.

Weather Updates
Rain Update : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार सरी पडल्या. पुणे जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये काही वेळ मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा जोर जास्त होता.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रांमध्ये मध्यम ते जोरदार पावसानं हजेरी लावली. तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये पाऊस पडला. धुळे, नंदूरबार आणि जळगावमध्ये काही मंडळांमध्ये पाऊस पडला.

Weather Updates
Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर काही मंडळांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या.

तर इतर मंडळांमध्ये पावसाचा जोर कमी होता. वाशीम आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये हलक्या पावसानं हजेरी लावली. अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. चंद्रपूर, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं.

हवामान विभागानं आज राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. कोकणाताली सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर तसचं मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही मंडळांध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com