Weather Update : राज्यातील कोणत्या भागांत मुसळधार पावसाचा इशारा ?

राज्यात गुरुवारी पावसाचा जोर वाढला होता. बहुतांशी भागांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या. मात्र काही ठिकाणी अद्यापही पावसाची उघडीप कायम आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यात गुरुवारी पावसाचा जोर (Rain Intensity) वाढला होता. बहुतांशी भागांत हलक्या ते मध्यम सरी (Rainfall) पडल्या. मात्र काही ठिकाणी अद्यापही पावसाची उघडीप कायम आहे. तर हवामान विभगानं (Weather Update) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय.

Rain Update
Weather Update : प्रशांत महासागरातील ला निना स्थिती वर्षाअखेरपर्यंत राहणार

कोकणात पावसाचा जोर वाढलाय. पालघर जिल्ह्यातील मोखेडा येथे ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जव्हार, तलासरी येते मध्यम सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातही अनेक मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. माथेरान, पोलादपूरआणि मानगाव येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर इतर ठिाकणी हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून, संगमेश्वर आणि मंडणगड येथे काही वेळ जोरदार सरी झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडल, सावंतवाडी या मंडळांमध्ये मध्यम सरी पडल्या. तर इतर भागात हलका पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. गगणबावडा, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ या मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी , ओझरखेडा, सिन्नर, येवला आणि पिंपळगाव बसवंत या मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर इतर भागांमध्ये हलक्या सरी पडल्या. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, शिरुर आदी मंडळांमध्ये पाऊस झाला. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधील बहुतांश मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

Rain Update
Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

धुळे जिल्ह्यातही गिधादे, शिरपूर आणि धुळे मंडळात मध्यम ते जोरदार सरी झाल्या. जळगाव जिल्ह्यातही बहुतांशी मंडळात हलका पाऊस झाला. यावल येथे ६५ मिलिमीटर पाऊस पडला. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मंडळांत पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील अकोले येथे १६६ मिलिमीटर पाऊस पडला. तर राहता येथे ११३ मिलिमीटर आणि सावलीविहीर येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर इतर भगांत हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मंडळात मुसळधार पाऊस झाला. तर गंगापूर, विजापूर मंडळातही हलक्या सरी पडल्या. बीड जिल्ह्यातही आंबेगाव, धारूर, माजलगाव आणि शिरूर कासार मंडळात हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे काही वेळ जोरदार सरी पडल्या. लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, लोहारा, परंडा, वाशी या मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम होती.

विदर्भातही काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. अकोला, अमरावती आणि भंडा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यात ठिकाठिकाणी हलक्या सरी झाल्या. तर तुरळक मंडळांत मध्यम सरी पडल्या. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगा राजा या मंडळांमध्ये मध्यम सरी झाल्या. तर इतर ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रागयगड ठाणे आणि पालघर तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा दिलाय. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना आणि नांदेड तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com