Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १४) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. आज (ता. १४) कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Heavy Rain
Cotton Crop Management : कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली वायव्येकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, गुना, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, पेंद्रा रोड, जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Heavy Rain
Rain : पावसाचा बसतोय भाजीपाला पिकाला फटका

ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) दक्षिण कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे.

बुधवारी (ता. १४) राज्यात पावसाचा इशारा. (सौजन्य : हवामान विभाग)

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com