Weather Update : विजा, मेघगर्जनेसह पावसाचे सावट कायम

राज्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. या वादळी पावसाचे सावट कायम असल्याने आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पाऊस (Rainfall With Lightning) पडत आहे. (Heavy Rainfall) या वादळी पावसाचे सावट कायम असल्याने आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह (Thunderstorm) पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy weather) हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडा पासून, दिल्ली, हरदोई, वाराणसी रांची, बालासोर ते ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण

वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता.२१) राजस्थान, पंजाब, हरियाना आणि कच्छच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता. २०) ओडिशाच्या किनाऱ्याकडे येताना, या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com