Heavy Rain : मुसळधार पावसाचा मध्य प्रदेशात कहर

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाने सोमवारी (ता. २२) कहर केला. एकाच दिवसात राज्यात जोरदार वाऱ्यासह १,५०० मिमी पावसाची नोंद झाली.
MP Rain Update
MP Rain UpdateAgrowon

भोपाळ, मध्य प्रदेश (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुसळधार पावसाने (Heavy Rain Madhya Pradesh) सोमवारी (ता. २२) कहर केला. एकाच दिवसात राज्यात जोरदार वाऱ्यासह १,५०० मिमी पावसाची नोंद झाली. भोपाळमध्ये सोमवारी सकाळी जोरदार वाऱ्यामुळे (Wind) वरच्या तलावातील एक मोठे जहाज पाण्यात बुडाले. तलावाच्या लाटा २० फुटांपर्यंत उसळताना दिसत होत्या.

MP Rain Update
Heavy Rain : हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी लोकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यात मुसळधार पावसात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

मध्य प्रदेशात, गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. भोपाळ, गुना, रायसेन, सागर, जबलपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना अतिवृष्टीबाबत दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नर्मदा, शिप्रा, बेतवा, सिंध, शिवना या नद्या धोक्याच्या इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत, तर ओव्हरफ्लो पाण्यामुळे २५ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच, नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नर्मदापुरमचे प्रशासन हाय अलर्टवर आहे.

MP Rain Update
Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती कायम

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या भागात मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नर्मदापुरममध्ये पाण्याची पातळी वाढून धोक्याच्या इशारा पातळीवर पोहोचल्यानंतर प्रशासन दक्ष झाले आहे. पाण्याची पातळी वाढली असली तरी, चिंताजनक पातळीपेक्षा दीड फूट कमी आहे, असे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंग सांगितले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, नर्मदापुरम जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी (ता. २०) राज्याच्या मोठ्या भागात पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. गुना जिल्ह्यात सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान ४४ मिमी पाऊस झाला. पूर्व मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत ८६.९ मिमी पाऊस झाला.

३९ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा रेडअलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुसळधार पाऊस सुरू राहील. भारतीय हवामान खात्याने सोमवारी भोपाळ, उज्जैन, जबलपूर, रतलाम, नीमच आणि मंदसौरसह ३९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला. मध्य प्रदेश आणि लगतच्या दक्षिण उत्तर प्रदेशच्या मध्यभागी खोल दबाव कमी झाला आहे. इंदूर, ग्वाल्हेर, धार आणि खरगोनसह बारा जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही विभागाने वर्तवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com