Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर धुव्वाधार

राज्यातही पाऊस परतला; विदर्भात दमदार हजेरी
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : जून महिन्यात दडी मारणारा मॉन्सून सक्रिय (Monsoon Active) झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर धुव्वाधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पाऊस परतल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीतील लांजा येथे सर्वाधिक ३४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy Rainfall In konkan)

दोन दिवसांपासून कोकणात दमदार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती आहे. जगबुडी, काजळी, अर्जुना नद्यांना पूर आले आहेत. भात शेती पाण्याखाली गेली आहे. तर मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तर कोकणात जोरदार सरी कोसळत आहेत. कोकणात बहुतांश ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक तर काही ठिकाणी २०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Rain Update
Weather Update: जून महिन्यामध्ये ५३ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

विदर्भातही पाऊस परतला असून, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यांतही मंगळवारी सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, गगनबावडा येथे २५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसाने पंचगंगा नदीवरील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही पावसाने दमदार सुरूवात केली आहे. मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

Rain Update
Monsoon Maharashtra Rains: जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस; माणिकराव खुळे यांचा अंदाज

मंगळवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : कुलाबा ११७, सांताक्रुझ १२४.

पालघर : डहाणू १४४, पालघर १८८, तलासरी ११९, वसई ११०.

रायगड : अलिबाग १००, कर्जत १०२, खालापूर १३५, महाड १८८, माणगाव २३०, माथेरान १२२, म्हसळा १२७, मुरूड ११६, पनवेल १७२, पेण १३९, पोलादपूर १६९, रोहा १०७, सुधागडपाली १३४, तळा २४५, उरण १४६.

रत्नागिरी : चिपळूण १६९, दापोली १४५, हर्णे ११४, लांजा ३४२, मंडणगड २०५, राजापूर १२२, रत्नागिरी १०५, संगमेश्वर २१०, वाकवली १२१.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग १४०, कणकवली ११५, कुडाळ १६७, मालवण २२५, मुलदे (कृषी) ११८, सावंतवाडी १८७, वैभववाडी २३०, वेंगुर्ला १९६.

ठाणे : आंबरनाथ १८८, भिवंडी १६०, कल्याण १९४, ठाणे १८२, उल्हासनगर १७३.

....

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : आजरा ५४, चंदगड ६९, गगणबावडा २५९, पन्हाळा ६८, राधानगरी १०९, शाहूवाडी ८८.

नाशिक : हर्सूल ८३, इगतपुरी ७२.

पुणे : लोणावळा कृषी ७६, पौड ४६, वेल्हे ६८.

सातारा : जावळीमेढा ५२, महाबळेश्वर १४६.

मराठवाडा :

नांदेड : भोकर ३४, मुदखेड ३८, नांदेड ४७.

उस्मानाबाद : वाशी ४८.

परभणी : पूर्णा ३०.

विदर्भ :

अमरावती : अमरावती ६८, चांदूरबाजार ६०, धामणगाव रेल्वे ७२,

धारणी ४८, मोर्शी ९२, तिवसा १२६, वरुड ५९.

भंडारा : लाखणी ६३, मोहाडी ७३, पवनी ४२, साकोली १२५, तुमसर ५४,

चंद्रपूर : ब्रह्मपुरी ५०.

गडचिरोली : आरमोरी ७१, देसाईगंज ५२, धानोरा ४८, गडचिरोली ६६, कोरची १५५, कुरखेडा १००.

गोंदिया : अर्जुनीमोरगाव ५४, देवरी ५०, गोंदिया ८२, गोरेगाव १०७, सडकअर्जुनी १५१, तिरोडा १४०.

नागपूर : कळमेश्वर ६०, नरखेड ६०, पारशिवनी ७८, रामटेक ८४, सावनेर १०९.

वर्धा : आर्वी १२३, देवळी ९०, सेलू ७१, वर्धा ५०.

यवतमाळ : यवतमाळ ४७.

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :

लांजा ३४२, संगमेश्वर २१०, मंडणगड २०५ (जि. रत्नागिरी), तळा २४५, माणगाव २३० (जि. रायगड), वैभववाडी २३०, मालवण २२५, (जि. सिंधुदुर्ग), गगनबावडा २५९ (जि. कोल्हापूर).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com