कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा
कोकण, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज
Heavy RainsAgrowon

पुणे : मॉन्सूनने (Monsoon) जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर राज्यात पावसाला पोषक (Favorable Climate ) हवामान होत आहे. आज (ता. १८) कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain Forecast) आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविला आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशपासून मनीपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बिहारपासून ओडिशापर्यंत दक्षिणेत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर तमिळनाडूजवळ देखील चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटकपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढत जाणार आहे.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान ३६ अंशांच्या खाली घसरल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. मात्र उकाड्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये ( स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर २२, खालापूर ४८, कणकवली ३८, मालवण ५८, सावंतवाडी ३४, वैभववाडी ५३.

मध्य महाराष्ट्र : साक्री २९, ओझरखेडा १८, सुरगाणा १५, महाबळेश्वर २०.

मराठवाडा : परळी वैजनाथ २१, वाडवणी ३५, अहमदपूर २५, जळकोट ४४, उदगीर ४८, मानवत २५, पालम ४२, सोनपेठ ४४.

विदर्भ : अकोला ९५, बाळापूर ३९, पातूर ३५. तेल्हारा २७, धामणगाव रेल्वे २३, चिखली ४७, खामगाव ५०, हिंगणा २३.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : सिंधुदुर्ग.

विदर्भ : यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com