
पुणे : मॉन्सूनचा पाऊस (Rain Update Maharashtra) राज्यात सर्वदूर दमदार कोसळू लागला आहे. मुसळधार पावसाने (Heavy Rain) अनेक भागात दाणादाण उडवून दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, मराठवाडा आणि विदर्भालाही पावसाने झोडपून काढले आहे. अनेक तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान (Kharip Crop Damage Due To Heavy Rain) झाले आहे.
जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी कोसळणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोकण, घाटमाथ्यावर थैमान घातले आहे. दुसऱ्या आठवड्यातही घाटमाथ्यासह, विदर्भ, मराठवाड्यात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असल्याने खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. नद्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमीनी खरवडून पिके वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी आठवडाभरापासून सूर्य दर्शन झाले नाही.(Monsoon news updates)
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा दणका सुरूच असल्याचे दिसून आले आहे. तर धरणांच्या पाणलोटातील दमदार पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहिल्याने धरणे भरू लागली आहेत. नाशिक, पुणे, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर उजनी धरण अचल साठ्यातून चलसाठ्यात आले असून, जायकवाडी, कोयना धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अनेक धरणे ओसंडून वाहणार आहेत.
मंगळवारी (ता. १२) सायंकाळपासूनच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. बुधवारी (ता. १३) राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होत असून, मशागतीची कामे ही खोळंबली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.
बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण :
माथेरान २२०, वाडा १५०, कर्जत १४०, खालापूर, पालघर, लांजा, विक्रमगड प्रत्येकी १२०, सुधागड पाली ११०, चिपळूण, पेण प्रत्येकी १००, मोखाडा, पनवेल प्रत्येकी ९०.
मध्य महाराष्ट्र :
लोणावळा १९०, महाबळेश्वर १४०, गगनबावडा १२०, राधानगरी, पौड, इगतपुरी प्रत्येकी १००, वेल्हे, पेठ प्रत्येकी ९०, ओझरखेडा ७०, हार्सूल, शाहूवाडी प्रत्येकी ५०, नवापूर, त्रिंबकेश्वर, वडगाव मावळ, पाटण, पुणे शहर, गारगोटी, आजरा, पन्हाळा प्रत्येकी ५०.
मराठवाडा
किनवट २१०, हिमायतनगर १९०, मुदखेड १८०, भोकर १७०, अर्धापूर, उमरी, हदगाव प्रत्येकी १५०, धर्माबाद १४०, नांदेड १३०, बिलोली, मुखेड, पालम प्रत्येकी ११०, पूर्णा १००, नांदगाव खैरगाव, वसमत, कंधार, लोहा प्रत्येकी ९०, कळमनुरी, अहमदपूर, लोहारा प्रत्येकी ८०, परभणी, जळकोट, चाकूर, रेणापूर, औसा, उस्मानाबाद प्रत्येकी ७०, माहूर, औंढानागनाथ, परळी वैजनाथ, उदगीर, पाथरी, लातूर, तुळजापूर, सोनपेठ, निलंगा प्रत्येकी ६०.
विदर्भ :
भामरागड, जेवती प्रत्येकी १६०, समुद्रपूर, तुमसर, सावनेर प्रत्येकी १५०, सिरोंचा, कोर्पणा प्रत्येकी १४०, लाखंदूर, उमरेड, अहिरी, उमरखेड प्रत्येकी १३०, रामटेक १२०, साकोली, भिवापूर, महागाव, पवनी, झारी झामणी प्रत्येकी ११०, कुही, हिंगणघाट, अर्जूनी मोरगाव, अरमोरी, पारशिवणी, तिरोडा, गोरेगाव प्रत्येकी १००.
घाटमाथा : अंबोणे २८०, ताम्हिणी, दावडी २१०, कोयना (नवजा) २००, डुंगुरवाडी, लोणावळा १९०, शिरगाव, खोपोली प्रत्येकी १८०, खंद १७०, भिवापूरी १४०, भिरा १२०, वाणगाव, कोयना पोफळी प्रत्येकी ११०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.