Rain : पावसाचा धुमाकूळ सुरूच

नांदेडमध्ये गुरुवारी (ता.४) सकाळपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरूच राहिला.
Nanded Rain
Nanded RainAgrowon

नांदेड : नांदेडमध्ये गुरुवारी (ता.४) सकाळपासून सुरू झालेला पाऊस (Nanded Rain) दिवसभर सुरूच राहिला. हा पाऊस सर्वच तालुक्यांत झाला. कुंटूर मंडलात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. शुक्रवारी (ता. ५) सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.८० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. जिल्ह्याच्या अनेक भागांत दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर (Flood) आले. त्यामुळे सखल भागातील पिके पाण्याखाली (Crop Under Water) गेली आहेत. सततच्या पावसामुळे जमिनी चिबडून पिके नासत आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढत आहे.

Nanded Rain
Nanded Rain : नांदेडमध्ये पुन्हा संततधार

जिल्ह्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. खरिपातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर ऑगस्टमध्ये उघडीप मिळेल, असे वाटत असताना पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने पिकांच्या नुकसान क्षेत्रात वाढ होत आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु असल्याचे सांगत येत असले तरी अनेक भागांतील शेतीच्या नुकसानीची पाहणी झाली नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

Nanded Rain
Rain Update: राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला | ॲग्रोवन

गुरुवारी नायगाव तालुक्यातील कुंटूर मंडलांत ७६.३० मिलिमीटर, करखेली, जारीकोट व गोळेगाव मंडलांत प्रत्येकी ६४.५०, कंधार ५८.५०, हदगाव ५५.५०, कापसी ५२.८०, कलंबर ४८, तुप्पा ४७.५०, विष्णुपुरी ४६.८०, नाळेश्‍वर ४६.३०, हिमायतनगर ४६, बिलोली ४४, लोहगाव ४४, जवळगाव ४३.५०, सरसम ४३.५०, कुंडलवाडी ४३, मुगट ४२.३०, बारड ४१.८०, तर अर्धापुरात ४१.८० मिलिमीटर पाऊस झाला.

तालुकानिहाय पाऊस

नांदेड ३३.१०, बिलोली २७.५०, मुखेड १९.४०, कंधार २८, लोहा २६.५०, हदगाव २५.२०, भोकर २०.७०१, देगलूर ६.३०, किनवट ८.२०, मुदखेड ३९.१०, हिमायतनगर ४४.३०, माहूर ३.४०, धर्माबाद ४४.३०, उमरी २८.१०, अर्धापूर ३८.६०, नायगाव ३६.७०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com