Rain Update : सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. १७) रात्रभर पावसाच्या दमदार सरी कोसळल्या आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सातारा ः जिल्‍ह्यात पावसाचा जोर वाढला असून, सोमवारी (ता. १७) रात्रभर पावसाच्या दमदार सरी कोसळल्या (Heavy Rainfall) आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ३०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतातील सर्व कामे ठप्प असून, पिकांचा नुकसानात (Crop Damage) भर पडत आहे.

Rain Update
Rain Update : कोल्हापुरात शेतकरी हतबल

परतीचा पाऊस संततधार पडत असल्याने खरिप पिके जागेवर उगवण्यास सुरू झाली आहे. सोयाबीन, आले, बटाटा पिकांत पाणी साचत असल्याने पिके कुजू नये यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र पाऊस सुरूच असल्याने सर्वच कामावर मर्यादा येत आहे.

उसात सरीत पाण्यामुळे ऊस आडवे होऊ लागले आहेत. झेंडू फुलात पाणी साचून राहत असल्याने फुले कुजत आहेत. जिल्ह्यात सर्वच भागांत पाऊस पडत आहे. दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. सततच्या पावसामुळे शेतात पाणी राहत असल्याने हाताला लागण्याची आशा धुसर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खंडाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने लोणंद येथील खेमावती नदीला पूर आला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये

सातारा २६.९, जावळी २७.९, पाटण १०.२. कऱ्हाड २७.३, कोरेगाव ५२.१, खटाव २१.९, माण १२, फलटण ३९.९ खंडाळा ६७.२, वाई ५६.९, महाबळेश्‍वर १७.९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com