Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता.३०) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता.३०) पहाटेपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरू आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या सरीवर (Rain Update) सरी कोसळत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यात भातरोपे लागवडीला (Paddy Seedling Planting) वेग आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्हयात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु मंगळवारी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. मात्र गुरुवारी पहाटेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. काल दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यात आज अधिकच वाढ झाली आहे. आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस जिल्ह्यात सुरू आहे.

Rain Update
Rain Update :मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीच्या देवगड, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये देखील अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडत आहे. या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तिलारी, गडनदी, शुक नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.

दमदार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यात भातरोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. शेतशिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेल्याचे चित्र गावागावात पाहायला मिळत आहे. पुढील दोन तीन दिवसांत भातरोप लागवडीला गती येण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com