Weather Update : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत इगतपुरी, पेठ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.
Weather Update
Weather UpdateAgrowon

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. (Heavy Rainfall) शुक्रवारी (ता. १६) सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत इगतपुरी, पेठ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यासह सुरगाणा, त्र्यंबकेश्र्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक (Dam Intake) वाढली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे.

गुरुवार पासून (ता. १५) जिल्ह्यात सर्व दूर पावसाच्या सरी सुरू आहेत. अधूनमधून हा पाऊस उघडतो; मात्र पुन्हा जोरदार हजेरी लावत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. पंधरा दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे चालू वर्षीचा खरीप हंगाम ओल्या दुष्काळाच्या छायेखाली गेल्याची गंभीर स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी घोटी, टाकेद व पेठ महसूल मंडळात जोरदार अतिवृष्टी होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांत भात खाचारांमध्ये पाणी साचून राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे आगामी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सटाणा तालुक्यात संततधार पावसामुळे टोमॅटो, डाळिंब, कोबी या पिकांचे नुकसान होऊन पिके रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांत खरीप पिके जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये सोयाबीन, मका, बाजरी ही प्रमुख पिके आहेत. तर भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, गाजर, वाटाणा, वांगी व वेलवर्गीय पिकांमध्ये कारले, गिलके, वाल पापडी अशा लागवडीत नुकसान वाढत आहे. पावसामुळे प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक फवारण्या करता येत नाहीत आणि पाऊस उघडल्यानंतर फवारण्या केल्यास पुन्हा ही मात्रा धुवून जात असल्याने शेतकऱ्यांचा खर्च मातीमोल होत आहे.

धरणातून विसर्ग वाढविला..

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून धरणे शंभर टक्के भरण्याच्या

मार्गावर आहेत. त्यामुळे संभाव्य धोका विचारात घेऊन जलसंपदा विभागाच्या

वतीने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक

शहरातील पंचवटी रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने या

भागातील जनजीवन विस्कळीत झाले. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची

आवक असल्याने ३६,७३१ क्युसेक विसर्ग गोदावरीपात्रात सोडण्यात येत

आहे.

सुरू असलेला विसर्ग

(ता. १६ रोजी

दुपारी २ वाजेची स्थिती)

दारणा १०,५६२

मुकणे १,०८९

कडवा ७,६३२

वालदेवी ४०७

गंगापूर ४,८१५

आळंदी ४४६

भोजापूर ९९०

पालखेड ५,५३८

या मंडलांत अतिवृष्टी

मंडल पाऊस (मिमी)

इगतपुरी ११८.८

घोटी ८५ टाकेद ६६.५ पेठ ६७.५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com