Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कोकण, घाटमाथ्यावर अक्षरशः धुमशान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कोकण, घाटमाथ्यावर (Heavy Rain Konkan) अक्षरशः धुमशान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे सर्वाधिक ३२५ मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागाने (Weather Department) म्हटले आहे. तर नगरमधील रतनवाडी (ता. अकोले) ३१२ मिलिमीटरची नोंद झाल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

Rain Update
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. उत्तर कोकणातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यांत पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जव्हार, मोखाडा, तलासरी येथे २५० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने धरणांच्या पाणलोटातील नद्या, नाले ओसंडून वाहू लागले. धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. यामुळे उजनी, जायकवाडी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुरवठा होत असल्याने या धरणांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर, नगर, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा दणका मंगळवारीही कायम होता.

मध्य महाराष्ट्रातील पूर्व भागात पावसाची हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. तर मराठवाड्यात पावसाचा पावसाचा जोर कमी असला तरी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची बरसात सुरू आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची जोर वाढल्याचे दिसून आले.

मंगळवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

--

कोकण :

पालघर : डहाणू १००, जव्हार २८५, मोखाडा २७३, पालघर १०६, तलासरी २६०, वसई १०३, विक्रमगड १६७, वाडा १९८,

रायगड : कर्जत १५०, खालापूर १३०, महाड ११०, माथेरान १४६, पेण १२०, रोहा १४९, सुधागडपाली १९२.

रत्नागिरी : खेड १२१, मंडणगड १०८, संगमेश्वर १०८.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी ७०.

ठाणे : आंबरनाथ १३८, भिवंडी १५५, कल्याण १४९, शहापूर १०५, ठाणे १००, उल्हासनगर १३१.

मध्य महाराष्ट्र :

धुळे : साक्री ९३.

जळगाव : अंमळनेर ५०, धरणगाव ५०, यावल ७२,

कोल्हापूर : आजरा ८१, गगनबावडा ९०, पन्हाळा ६४, राधानगरी ८२, शाहूवाडी ९६.

नंदूरबार : नवापूर १५५, तळोदा ६५.

नाशिक : देवळा ६७, दिंडोरी १०४, हर्सूल २०३, इगतपुरी १८८, कळवण ९५, मालेगाव ८१, नाशिक ९७, ओझरखेडा १५६, पेठ ३२५, पिंपळगाव बसंवत १३८, सटाणा ७५, सुरगाणा १५९, त्र्यंबकेश्वर १७४.

पुणे : भोर ६९, जुन्नर ६४, लोणावळा कृषी १९९, पौड १७१, लोहगाव १०५, वडगाव मावळ १०१, वेल्हे १०६.

सातारा : जावळीमेढा ६०, महाबळेश्वर २५३, पाटण ७९.

मराठवाडा :

नांदेड : कंधार ३२, किनवट ७०, माहूर ७२.

विदर्भ :

भंडारा : लाखणी ५३, साकोली ६५.

चंद्रपूर : बल्लारपूर ११०, चंद्रपूर ६२, जेवती ८७, कोर्पणा ५९, राजुरा ८१.

गडचिरोली : अहिरी २०९, धानोरा ५०, एटापल्ली ६४, गडचिरोली ७२, सिरोंचा ७०,

गोंदिया : गोरेगाव ६५, सडकअर्जुनी ५०, तिरोडा ५५,

नागपूर : नरखेड ५२.

यवतमाळ : आर्णी १०५, घाटंजी ५७, वणी ५४, झारी झामणी ५५.

या धरणांत पाण्याची आवक

पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरण लवकरच उजनी धरण अधिकमध्ये जाणार आहे. तर कोयना धरणात प्रतिसेकंद ४३,५५७ क्यूसेस पाण्याची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, कळमोडी, वीर, चिल्हेवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे. तर अन्य टेमघर, वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई, चासकमान, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, पिंपळगाव जोगे धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. चांदोली धरणातील पाणीपातळी वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, राधानगरी धरणांत ही साठा वाढत आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे, भंडारदरा, निळवंडे धरणातही आवक सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील साठा वाढत असून नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरू केल्यामुळे आवक सुरूच आहे.

या नद्यांना आला पूर

- रत्नागिरी ः जगबुडी, नारिंगी,

- हिंगोली ः पूर्णा,

- कोल्हापूर, सांगली ः कृष्णा, वारणा, पंचगंगा,

- नाशिक ः गोदावरी

- धुळे ः पांझरा, कान, गिरणा,

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com