Weather Update : पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १२) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. आज (ता. १२) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Heavy Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

Heavy Rain
Weather Update : नैऋत्य मॉन्सून पुन्हा सक्रिय

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा गुजरातच्या नालिया, अहमदाबाद, ब्रह्मपुरी, जगदलपूर, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

Heavy Rain
Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरूच नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, अरबी समुद्रातील चक्राकार वारे या पोषक प्रणालींमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ११) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे.

ठळक कमी दाब क्षेत्र झाले तीव्र

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र (डिप्रेशन) झाले आहे. ही प्रणाली ओडिशाच्या भवानीपट्टणनपासून ८० किलोमीटर आग्नेयेकडे, गोपाळपूरपासून ११० किलोमीटर पश्चिमेकडे, छत्तीसगडच्या जगदलपूरपासून आग्नेयेकडे २१० किलोमीटर अंतरावर आहे. ही प्रणाली दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड कडे सरकताना हळूहळू निवळण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा ( येलो अलर्ट)

कोकण : मुंबई, ठाणे.

विदर्भ : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर,

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com