Rain Updates: वऱ्हाडात दमदार पावसाची सर्वत्र हजेरी

या भागात गुरुवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार वऱ्हाडातील प्रत्येक तालुक्यात प्रथमच जोरदार पाऊस (Heavy Rain) झालेला आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद तालुका सर्वात पिछाडीवर पडला होता. आता त्याही ठिकाणी पाऊस झाला.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

अकोला ः गेले काही दिवस रिमझीम स्वरूपात येत असलेल्या पावसाने मागील २४ तासांत सर्वदूर चांगली हजेरी दिली. यंदाच्या पावसाळ्यात आजवर राज्यात सर्वाधिक तूट निर्माण झालेल्या जळगाव जामोद (जि. बुलडाणा) या तालुक्यातही दमदार पाऊस (Heavy Rain) झाल्याची नोंद आहे.

या भागात गुरुवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार वऱ्हाडातील प्रत्येक तालुक्यात प्रथमच जोरदार पाऊस (Heavy Rain) झालेला आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद तालुका सर्वात पिछाडीवर पडला होता. आता त्याही ठिकाणी पाऊस झाला. जळगाव जामोद, जामोद, पिंपळगाव काळे, वडशिंगी, आसलगाव या सर्व मंडळांमध्ये सरासरी ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लगतच्या संग्रामपूर तालुक्यातही संग्रामपूर मंडलात ५६.३, सोनाळा ३९.३, बावनबीर ५६.३, पातुर्डा ४३.८, कवठळ ४३.८ पावसाची नोंद आहे.

बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांमध्ये सलग ४८ तासांपासून चांगला पाऊस (Heavy Rain) होत आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी दिली. हादगाव, निंबा, आलेगाव, बाभूळगाव, सस्ती या मंडळांमध्ये ५० मिलिपेक्षा अधिक पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले आहेत.

बाळापूर तालुक्यात नया अंदुरा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत असू नागद, सागद, कारंजा, रमजानपूर, हातरुण या रस्त्यावरील पुलावरून जात असल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून रस्ता वाहतुकीसाठी (Transportation) बंद करण्यात आला होता.

मेहकर तालुका आघाडीवर

यंदाच्या पावसाच्या दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या ३५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यातील अंजनी मंडळात सर्वाधिक ४५९ मिलिमीटर पाऊस आजवर झालेला आहे. दुसरीकडे सर्वांत कमी १२५ मिलिमीटर पावसाची नोंद याच जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याची आहे.

वाशीम जिल्ह्यात अनेक मंडळात अतिवृष्टी

गेल्या २४ तासांत वाशीम जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. वाशीम ९०.८, पार्डी टकमोर ९४.५, नागठाणा ९०.८, कोंढाळा ९०.८, रिठद ७०, कवठा ७०, किन्हीराजा ९१.३, मुंगळा ७४.८, मेडशी ७४.८ अशा विविध मंडळात अतिवृष्टीची (Extremely Heavy Rain) नोंद झाली. पेरणी झालेल्या पिकांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पेरणीचे काम सुरू होते. गेल्या आठवड्यात लागवड केलेल्या बियाण्यासाठी हा जोराचा पाऊस मारक ठरू शकतो. १ जूनपासून आजवर या जिल्हयात ३५२ मिलिमीटर पाऊस पडला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com