Crop Damage: नाशिकमध्ये अतिवृष्टीचा १,२४१ हेक्टरला फटका

पावसाने खरिपातील पिकांचे (Kharip Crops) मोठे नुकसान केले आहे. ९ ते १२ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये १,२४० हेक्टर ६० आर क्षेत्रावरील पिकांची दाणादाण उडाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : जिल्ह्यात गेल्या सप्ताहापासून सुरू असलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे (Kharip Crops) मोठे नुकसान केले आहे. ९ ते १२ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये १,२४० हेक्टर ६० आर क्षेत्रावरील पिकांची दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये सोयाबीन, मका, भात, भुईमूग, भाजीपाला आणि उसाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान कळवण तालुक्यात आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या (Agriculture Department) अतिवृष्टी नुकसानीबाबतच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

जिल्ह्यात ११८ गावांमधील २ हजार ९४५ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गिरणा धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यात गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये मका (Maize) व सोयाबीनचे (Soybean) मोठे नुकसान झाले आहे.

गोदावरीला (Godavari) पूर आल्याने निफाड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील मका, सोयाबीन, भाजीपाला व उसाचे नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यात भात पिकाचे नुकसान मोठे आहे. सर्वाधिक नुकसान मका पिकाचे ३८२.१० हेक्टर क्षेत्रावर आहे. यासह भाताचे ५२.२०, भुईमुगाचे १, सोयाबीनचे ७४०.३०, भाजीपाल्याचे ४०, उसाचे २५ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित आहे. पंचनामे झाल्यानंतर हा आकडा वाढण्याची मोठी शक्यता आहे.

प्राथमिक अहवाल निरंक

पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात शेतकऱ्यांचे भात (Paddy) , नागली वरई हे पीक अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे वाहून गेले. मात्र कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात या तालुक्यामधील नुकसानीच्या नोंदी निरंक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर संकलित माहिती वरचेवर जाहीर होते का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वस्तुनिष्ठ पंचनामे होतील व त्यावेळीच वास्तविक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पिके पाण्याखाली असल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तालुकानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टर) :

बागलाण-मका...२, भुईमूग...१.

कळवण - मका...२५०.१०, सोयाबीन...४७२.३०.

देवळा - मका...४०.

दिंडोरी -सोयाबीन...५८,भाजीपाला...२५.

सुरगाणा - भात-५२.२०.

निफाड - मका...९०, सोयाबीन...२१०,भाजीपाला...१५, ऊस...२५.

बाधित गावे आणि शेतकऱ्यांची संख्या :

तालुका...गावे...शेतकरी

बागलाण...३...५

कळवण...४३...१,८७५

देवळा...४...६०

दिंडोरी...३३...१२६

सुरगाणा...१४...८९

निफाड...२१...७९०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com