Crop Damage : बुलडाण्यात अतिवृष्टीचा १५७०० हेक्टरला तडाखा

बुलडाणा ः जिल्ह्यात ११ व १२ सप्टेंबरला काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे सुमारे १५७०१ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

बुलडाणा ः जिल्ह्यात ११ व १२ सप्टेंबरला काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने पिकांचे सुमारे १५७०१ हेक्टरवर नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले असून, अंतिम अहवालानंतर हा नुकसानीचा आकडा निश्‍चित होणार आहे.

Crop Damage
Crop Damage : अठरा हजार अतिवृष्टिग्रस्तांना मिळणार ११ कोटींची मदत

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने ठाण मांडले आहे. कमी अधिक प्रमाणात ठिकठिकाणी संततधार पाऊस होत आहे. प्रामुख्याने रविवार (ता.११) व सोमवारी (ता.१२) संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. त्यातही संग्रामपूर तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Crop Damage : शेतकऱ्यांना केलेली मदत फसवी ः दानवे

या पावसामुळे संग्रामपूर तालुक्यात बावनबीर, संग्रामपूर महसूल मंडळात अधिक नुकसान झाले. बावनबीरमध्ये २४ तासांत तब्बल ११३ मिलिमीटर, तर संग्रामपूरमध्ये ८५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसासोबत जोराचे वादळही या भागात आले होते. परिणामी, पिके जमीनदोस्त झाली. संग्रामपूर तालुक्यात ६५०५ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले. याशिवाय जळगाव जामोदमध्ये ५५६३ तर नांदुरा तालुक्यात ३००० आणि खामगाव तालुक्यात ६२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना या आपत्तीचा तडाखा बसला. या आपत्तीत वीज पडून ठिकठिकाणी जिल्हयात पाच जनावरांचाही मृत्यू झाला. अतिवृष्टीने नुकसानीबाबत कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अंदाजे १५ हजार ७०० हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली आहे.

जळगाव जामोद, संग्रामपूरसह इतर तालुक्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कपाशी, मका, ज्वारी तसेच फळपिकांचे अतोनात नुकसान आहे. या अस्मानी संकटामुळे पहिल्यांदाच मोडकळीस आलेला शेतकरी पूर्ण कोसळून गेलेला आहे. या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंचनाम्यांची अट न ठेवता नुकसान भरपाई दिली पाहिजे. शेतकरी संघटनेने प्रशासनामार्फत याबाबत शासनाला निवेदनही दिले.
रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, जळगाव जामोद, जि. बुलडाणा
दोन दिवसांत संग्रामपूर तालुक्यात बावनबीर, संग्रामपूर मंडळांसह इतर ठिकाणी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. पीकविमा काढलेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीला तातडीने माहिती द्यावी. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत संबंधितांना निर्देशही दिले आहेत.
अमोल बनसोड, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com