Crop Damage : अतिपावसाचा खरीप पिकांना फटका

तेल्हारा तालुक्यात बागायती क्षेत्र बऱ्यापैकी असून, शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींवर मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली. तालुक्यात यावर्षी १५ जूनला थोडाफार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.
Crop Damage
Crop DamageAgrowon

तेल्हारा, जि. अकोला ः या भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा (Rain) आता पिकांवर परिणाम दिसू लागला आहे. पिके पिवळी पडणे (Crop Damage), काही ठिकाणी झाडे वाळणे, असे प्रकार दिसून येत आहेत. मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड केलेल्या शेतांमध्ये झाडे वाळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. (Crop Damage Due To Heavy Rain)

Crop Damage
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

तेल्हारा तालुक्यात बागायती क्षेत्र बऱ्यापैकी असून, शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींवर मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली. तालुक्यात यावर्षी १५ जूनला थोडाफार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर तालुक्यात पाऊस न झाल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. आता गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे शेतातील कपाशीची झाडे जळत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी कपाशीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

Crop Damage
Crop Damage : दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली

झाडांच्या वाढीवर परिणाम

पिकाला पाऊस अधिक झाल्याने आता पिके पिवळी पडू लागली. पिकांची वाढही खुंटली आहे. शेतांमध्ये कोणत्याही प्रकारची कामगिरी करता येत नसल्याने तण वाढले आहे. या सर्वच गोष्टींनी शेतकरी चिंतातूर आहे. असाच पाऊस होत राहिला तर बिकट परिस्थिती उद्‍भवण्याची चिन्हे आहेत. सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळी व खोडकिड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. वाणी नवीन झाडांची पाने कुरतडत आहेत.

मी दोन एकरांवर जून महिन्यात कपाशीची लागवड केली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कपाशीचे पीक जागेवर सुकू लागले आहे. पीक उत्पादन वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.
वैशाली पाटील, शेतकरी, तळेगाव बाजार, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com