मराठवाड्यात २५० मंडलांत पावसाची दमदार हजेरी

औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या ५ जिल्ह्यांतील २७९ पैकी २५० मंडलांत शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी (Rainfall) लावली. औरंगाबाद, जालना व उस्मानाबादमधील प्रत्येकी २ मंडलांत जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. पाचही जिल्ह्यांतील ७२ मंडलांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ९ तालुक्यांत सरासरी २२ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात सर्वाधिक ४७.७ मिलिमीटर पाऊस पडला.

औरंगाबाद, जालना, जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. २२ मंडलांत २० ते ६१ मिलिमीटर पाऊस झाला. औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड तालुक्यांसह पैठण व सिल्लोड तालुक्यांतील काही मंडलांत दमदार पाऊस झाला. करमाड मंडलात ६५.३, तर हर्सूल मंडलात १०४.३ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांत पाऊस झाला. १५ मंडलांत २० ते ४९ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील वाघरुळ मंडलात ९४, तर जामखेड मंडलात ६८.८३ मिलिमीटर पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४९ मंडलांत हलका, मध्यम पाऊस झाला. ८ मंडलांत २० ते ६२ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. बीड तालुक्यातील केवळ ३ मंडलांत दमदार पाऊस झाला. केज तालुक्यात पावसाची हजेरी दमदार राहिली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ५४ मंडलांत पाऊस झाला. उदगीरमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३३ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस बरसला. वाशी तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. वाशी मंडलांत ६५, तर तेरखेडा मंडलातही ६५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील १० मंडलांत सरासरी १० ते २५ मिलिमीटर पाऊस झाला.

पाऊस झालेले तालुके (सरासरी २० मि.मी.पुढे)

औरंगाबाद...३०.५

कन्नड...२९.२

फुलंब्री...३०.४

भोकरदन...२७.३

जालना...२८.८

अंबड...२५.४

बदनापूर...२२.४

केज...३०

वाशी...४७.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com