Heavy Rain : औरंगाबाद, जालना, लातूरमधील ९ मंडलांत अतिवृष्टी

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे कोरडवाहू शेतीत माना टाकणाऱ्या व जवळपास करपलेल्या पिकांना नवसंजीवनी देण्याचे काम दोन दिवसांपासून पडणारा पाऊस करतो आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

औरंगाबाद : दोन दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील विविध भागांत पावसाने (Heavy Rain Marathawada) कमी अधिक प्रमाणात हजेरी लावणे सुरू केले आहे. शुक्रवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबादमधील तीन लातूरमधील चार, तर जालन्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी (Excessive Rain) झाली. पाचही जिल्ह्यांतील २७९ पैकी २२८ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लागली.

Heavy Rain
Crop Damage : पिके, फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे कोरडवाहू शेतीत माना टाकणाऱ्या व जवळपास करपलेल्या पिकांना नवसंजीवनी देण्याचे काम दोन दिवसांपासून पडणारा पाऊस करतो आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडलांत पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यातील औरंगाबाद, उस्मानपुरा व कंचनवाडी या तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३५ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला.

Heavy Rain
Koyana Dam : कोयना धरणातून विसर्ग सुरू

जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत दमदार ते जोरदार व बदनापूर तालुक्यात मध्यम पाऊस झाला. घनसावंगी, अंबड, परतूर, मंठा तालुक्यातील मंडलांत पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाची होती. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. शिरूर कासार, पाटोदा, अंबाजोगाई, केज तालुक्यांत हलका, मध्यम, तर इतर तालुक्यांत तुरळक, हलका पाऊस नोंदल्या गेला. माजलगाव तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील लातूर व औसा तालुक्यांत दमदार ते जोरदार पाऊस झाला. या दोन तालुक्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी झाली. देवणी अहमदपूर शिरूर अनंतपाळ तालुक्यांत पावसाचा टिपूसही पडला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ४२ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला.

जिल्हानिहाय पावसाची मंडळ (पाऊस मिलिमिटरमध्ये)

उस्मानाबाद जिल्हा ः मागणी २७.३, मुरूम २५, मुळज ३७.३, नारंगवाडी ४१.८, भूम ३४, जागजी २८.८,असू ३३.५, पळशी ३३.५ भातमुंगळी ४३.५ किल्लारी ४१.८ किनी ३३.५ बेलकुंड २९.८ मातोळा २९.८ लांब जाणार ४२.८ कनेरी ३५.३ चिंचोली ६३.८ तांदूळजा ३६.३ गातेगाव ५३.३ मुरुड २९.३

बीड जिल्हा ः रायमोहा ३२.५, शिरूर ३४.८, होळ ३४, पाटोदा ३१.३

जालना जिल्हा ः दाभाडी २९.५, शेलगाव ३२, टेंभुर्णी ४४.५, कुंभारझरी ३१.३, माहोरा २८.५, जाफराबाद ४२.३, हसनाबाद ५३.८, पिंपळगाव ४७.३, अनवा २८, धावडा ४८, सीपोरा ४०.५

औरंगाबाद जिल्हा ः पीरबावडा ३४.३, सावलदबारा ४८, बाजारसांगवी २७, सुलतानपूर २९.८, वेरूळ ३७, आडुळ २५.५, हरसूल ५८, चित्तेपिंपळगाव २५.५, चिकलठाणा ३७.५, भावसिंगपुरा ३१.८.

जिल्हा निहाय अतिवृष्टीची

मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)

औरंगाबाद ८२.५

उस्मानपुरा ६९.३

कांचनवाडी ६९.३

जालना जिल्हा

भोकरदन १३६

केदारखेडा ७७.८

लातूर जिल्हा

लातूर ८३.३

औसा ६६

भादा ६६

हरंगुळ ८३.३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com