Heavy Rain : सटाण्यातील करंजाडी खोऱ्यात जोरदार पाऊस

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दाणादाण उडाली. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सटाणा तालुक्यातील करंजाडी खोऱ्यात करंजाड, भुयाने, पिंगळवाडे या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
Grape
Grape Agrowon

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने (Rainfall) दाणादाण उडाली. शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सटाणा तालुक्यातील करंजाडी खोऱ्यात करंजाड, भुयाने, पिंगळवाडे या परिसरात जोरदार पावसाने (Heavy Rain Nashik) हजेरी लावली. भुयाने परिसरात ५ ते ७ किलोमीटर परिसरात ९१ मिमी पावसाची नोंद झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिके (Vegetable Crop) आहेत. तसेच आगाप द्राक्ष हंगामात (Grape season) माल तयार होत असून काढणी तोंडावर आहे; मात्र अशातच हा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर परिसरात काही क्षणातच पाणीच पाणी झाले होते. अत्यंत कमी वेळात ओढे-नाले एक होऊन वाहू लागल्याने परिसर जलमय झाला होता. या भागात काकडी, गिलके, टोमॅटो, मिरची अशा भाजीपाला पिकांच्या लागवडी आहेत; मात्र होणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संरक्षणात्मक खर्च करावा लागत आहे.

Grape
Grape Crop Insurance : द्राक्षासाठी विमा योजना

मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागा व भाजपाला पिकातून पाणी शिवारातून बाहेर निघाले. गेल्या चार वर्षांपासून या भागात आगाप द्राक्ष उत्पादन घेणारा शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे एकरी लाखो रुपये उत्पादन खर्च करूनही हाती काहीच येत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांनी वैफल्यग्रस्त होत द्राक्ष बागा काढून टाकल्या आहेत; मात्र अशातच ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागा ठेवल्या आहेत, त्यांच्यासमोर संकट उभे आहे.

Grape
Grape Crop Insurance: द्राक्ष विमा योजनेचा लाभ कसा घ्याल ?

निफाड तालुक्याच्या पूर्व भागात धरणगाव परिसरात पावसाने हजेरी लावली तर दिंडोरी तालुक्यातील काही भागांत हलकासा पाऊस झाला. कळवण तालुक्यातील रात्रभर पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी अशा पिकांचे नुकसान झाले आहे.

द्राक्ष बागा वाचविण्यासाठी क्रॉप कव्हर तंत्रज्ञान

मालेगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या जवळील अजांदे, मथुरपाडे, भुईगव्हाण या भागांत द्राक्ष बागांत मोठ्या प्रमाणावर काळी वाणाच्या लागवडी आहेत. येथील बागा काढणी, फुलोरा अवस्थेत आहेत. त्यामुळे बागा वाचविण्यासाठी क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com