कोकणात जोरदार सरी

कोकणात जोरदार सरी

यंदा पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून आले आहे. तर १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर राज्यात पावसाला सुरूवात झाली.

पुणे : मॉन्सून सक्रिय (Monsoon Active) झाल्यानंतर राज्यात विविध भागांत कमी-अधिक स्वरूपात पावसाने (Rainfall) हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता. २४) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक (Rain Force) राहिला. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या शिवाय मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस (Rain Update) पडला. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

यंदा पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून आले आहे. तर १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर राज्यात पावसाला सुरूवात झाली. तोपर्यंत खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जवळपास आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी पडत आहेत. कमी अधिक पावसावर खरिपाच्या पेरण्या सुरू होणार आहेत.

दुसरीकडे राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये, घाटमाथ्यावर पावसाने अद्याप मुसळधार हजेरी लावलेली नाही. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.  

पेरण्यांना मिळणार चालना

शुक्रवारी (ता. २४) पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना चालना मिळणार आहे. पेरणी झालेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळणार आहे. मात्र नदी, नाल्यांना पूर येऊन, धरणे भरण्यासाठी जोरदार पावसाची अद्यापही प्रतिक्षा कायम आहे.

शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
कोकण :
पालघर : विक्रमगड ३४, वाडा २८.
रायगड : माथेरान ९२.
रत्नागिरी : दापोली ३०, गुहागर ८१, हर्णे ५७, लांजा २३.
सिंधुदुर्ग : देवगड ३५, दोडामार्ग ७५, कुडाळ ४०, मालवण ४८, सावंतवाडी ३३, वेंगुर्ला ४३.
ठाणे : कल्याण ३६, शहापूर ४५.

मध्य महाराष्ट्र :
नगर :
अकोले ४२, नेवासा २७, संगमनेर ४६, श्रीरामपूर ३७.
कोल्हापूर : चंदगड ३५.
नाशिक : दिंडोरी ३६, नाशिक २५, पिंपळगाव बसवंत २२, सिन्नर ४५, येवला ४५.
पुणे : इंदापूर २८.
सातारा : महाबळेश्वर ३३.

मराठवाडा :
औरंगाबाद :
पैठण २२, सिल्लोड २५.
बीड : आष्टी २४, धारूर २१, माजलगाव २१, परळी वैजनाथ ३१, पाटोदा २१, वाडवणी २०.
हिंगोली : कळमनुरी ४७.
लातूर : जळकोट ४८.
नांदेड : नांदेड ३३.

विदर्भ :
चंद्रपूर : ब्रह्मपुरी २५, सिंदेवाही २४.
गडचिरोली : देसाईगंजवडसा ३८, कुरखेडा ३५.
गोंदिया : अर्जुनीमोरगाव २०.
यवतमाळ : घाटंजी ३६, पांढरकवडा २४.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com