Rain Update : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी

कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. पेण, उरण, खालापूर, माथेरानसह घाटमाथ्यावरील ठाकूरवाडी, भिवपूरी येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने पुनरागमन (Monsoon Rain Return) केल्यानंतर राज्याच्या विविध भागात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस (Rainfall With Wind And Lightning) पडत आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरश: थैमान घातल्याने अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. ८) अतिवृष्टी (Excessive Rain) झाली आहे. तर मराठवाडा, विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. राजगड जिल्ह्यातील पेण येथे सर्वाधिक १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे (Weather Department) सांगण्यात आले.

Heavy Rain
Rain Update : वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस

कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. पेण, उरण, खालापूर, माथेरानसह घाटमाथ्यावरील ठाकूरवाडी, भिवपूरी येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पालघरच्या घाटमाथ्यावरील वाणगाव, सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथेही १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Heavy Rain
Heavy Rain : निफाड तालुक्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीसदृश पाऊस

मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे १२० मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे १०० मिलिमीटर पाऊस पडला. तर सातारा, नगर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाने दणका दिला. या पावसाने नदी नाल्यांना पूर आले असून, धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. या पावसाने खरिपाच्या पिकांचे नुकसान होणार आहे. हलक्या जमिनीतील पिके वाफसा स्थितीत आली होती. त्यातच पाऊस झाल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागांत बुधवारी (ता. ७) रात्रभर आणि गुरुवारी (ता. ८) दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. अकोले तालुक्यासह पाणलोटात झालेल्या पावसामुळे मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक झाली आहे. फुलोऱ्यावर आलेले बाजरीचे पीक कोलमडले. अनेकांच्या शेतांत पाणी साचल्याने पिकांची हानी झाली.

विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील निमखेड गिरोली बुद्रुक शिवारात असलेला जिल्हा परिषद सिंचन विभागाचा पाझर तलाव गुरुवारी (ता. आठ) अचानक फुटल्याने या तलावाखालील भागात असलेल्या शेकडो एकरातील कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील जोरदार पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पेण १८०, उरण १३०, खालापूर, माथेरान प्रत्येकी ११०, सावंतवाडी १००, वाडा, पोलादपूर, म्हसळा, मुळदे प्रत्येकी ९०, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, रोहा प्रत्येकी ८०, कर्जत, पनवेल, अंबरनाथ, शहापूर, कुडाळ, कणकवली, श्रीवर्धन प्रत्येकी ७०, मुरबाड ६०.

मध्य महाराष्ट्र : जेऊर १२०, लोणावळा १००, जुन्नर ९०, घोडेगाव, आंबेगाव, जावळी मेढा, शिरूर, वडगाव मावळ प्रत्येकी ८०, राजगुरुनगर ७०, इगतपुरी, तळेगाव प्रत्येकी ६०, कर्जत, चास, पाथर्डी, पुणे शहर, इंदापूर प्रत्येकी ५०, पारनेर ४०, पौड, राहुरी, श्रीगोंदा, खंडाळा, कडेगाव, सासवड, महाबळेश्वर, पाडेगाव, वेल्हे, अकोले, चिंचवड प्रत्येकी ३०.

मराठवाडा : परांडा ५०, औसा, परभणी, शिरूर कासार, वाडवणी, माजलगाव, हादगाव, पाटोदा प्रत्येकी ३०.

विदर्भ : ब्रह्मपुरी ४०, नागभिड, भामरागड, राजूरा, नरखेडा प्रत्येकी ३०.

घाटमाथा : वाणगाव, ठाकूरवाडी प्रत्येकी १३०, भिवपूरी, लोणावळा प्रत्येकी १००, शिरोटा, खोपोली प्रत्येकी ९०, वळवण ८०.

१०० मिलिमीटपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे

पेण १८०, उरण १३०, खालापूर ११०, माथेरान ११० (जि. राजगड), सावंतवाडी १०० (जि. सिंधुदुर्ग), जेऊर १२० (जि. सोलापूर), लोणावळा १०० (जि. पुणे).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com