Crop Damage : ‘जणू आभाळ फाटलं, अतिवृष्टीने ना पिके वाचली ना शेती’

सिन्नर तालुक्यात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पश्‍चिम पट्ट्यात सर्वत्र दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोनांबे, कोनांबे शिवडा या परिसरात शेती आणि पिकांचे होत्याच नव्हत झालं अशी भयावह स्थिती आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : ‘‘सायंकाळी सहा-सातच्या दरम्यान सगळं वातावरण मोकळं होतं; अशातच अचानक सात वाजता आभाळ काळ होऊन जमा झालं. अन् टपोऱ्या थेंबांसह कोसळधार (Heavy Rainfall Sinnar) सुरू झाली. क्षणार्धात जणू आभाळच कोसळलं. त्या पावसात ना पिके वाचली ना शेती’’ (Crop Damage) अशी कैफियत कातरत्या आवाजात कोनांबे (ता. सिन्नर) येथील शेतकरी मधुकर डावरे यांनी मांडली.

सिन्नर तालुक्यात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे (Cloudburst Rain) पश्‍चिम पट्ट्यात सर्वत्र दाणादाण उडाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोनांबे, कोनांबे शिवडा या परिसरात शेती आणि पिकांचे होत्याच नव्हत झालं अशी भयावह स्थिती आहे. गुरुवारी (ता. १) सायंकाळी ७ ते ९ च्यादरम्यान अवघ्या दोन तासांत १४४ मिलिमीटर पावसाची नोंद परिसरात झाली.

Crop Damage
सोनांब्याच्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

सोनांबे शिवारात काही क्षणांतच सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. ओढे, नाले एक झाले. परिसरात गुरदरी पाझर तलाव सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्याने नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलले. त्यामुळे अनेक शिवारांत पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्याचे भीषण वास्तव निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी तलावातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावर बांधलेले तीन लघू बंधारे फुटले. त्यामुळे पुढे नाल्यावर तीन ते चार लहान पूल तुटल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर येता येत नसल्याची स्थिती आहे. पुलाखाली टाकलेले सिमेंटचे पाइप प्रवाहासोबत दूरवर वाहून गेले आहेत.

Crop Damage
Crop Damage : सिन्नर, इगतपुरीत पावसामुळे पिकांचे नुकसान

तर नाल्यालागतची पिके व जमीन खरडून गेली आहे. त्यामध्ये टोमॅटो, गाजर, वाटाणा, कोबी, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. हे पाणी सोनांबे गावातून भैरवनाथ मंदिरासमोरून वाहिले. गेल्या ५० वर्षांत गावठाण परिसरात एवढी भीषण परिस्थिती पाहिली नाही. गावठाण परिसरालगतसुद्धा कमरेएवढे पाणी होते, असे ८० वर्षांच्या शकुंतला पवार यांनी सांगितले.

कोनांबे येथील चिपटी मळा परिसरात जोरदार पावसामुळे डोंगरावरून पाणी वाहून आल्याने डावरे कुटुंबीयांनी शेतीसाठी केलेले दोन सिमेंट पूल व त्याखालील पाइप वाहून गेले. तसेच लगतचे १५ गुंठे क्षेत्र मातीसह वाहून गेले. तर १५ एकर सोयाबीन मातीच्या बुजाट्याखाली दाबली गेली आहे.

अतिवृष्टीमुळे भयावह स्थिती

पाण्याच्या लोंढ्यासोबत शेताचे बांध फुटले, शेतात ओहोळ तयार झाल्याची स्थिती

शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्याने टोमॅटो, कोबी, गाजर व सोयाबीन लागवडी प्रभावित; भाजीपाला पिके पाण्याखाली तर काही भाजीपाला पिकांचे अवशेष पाण्यावर तरंगत असल्याचे गंभीर चित्र

नाल्यालगतच्या भागांतील ७ ते ८ विहिरी पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीमुळे बुजल्या.

भाजीपाला पिकांना मोठा फटका; झाडे, ठिबक साहित्य, मल्चिंग पेपर गेले वाहून

काही शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीवर पोयटा व काळी मती टाकून जमीन पुनर्भरण केले होते, अशा क्षेत्रात फक्त उघडा खडक तयार झाला.

शेतीतील वस्त्यांवर जाण्यासाठी नाल्यांवर बांधलेले पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com