Heavy Rain
Heavy RainAgrowon

Heavy Rain : दक्षिण कोकणात मुसळधार

मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पावसाची प्रतिक्षा आहे.

पुणे : मॉन्सून सक्रिय (Monsoon Active In Maharashtra) झाल्याने राज्याच्या काही भागात पावसाचा जोर (Rain Force) आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पावसाची (Sowable Rain) प्रतिक्षा आहे. मंगळवारी (ता. २८) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडला.

Heavy Rain
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर, वाकवली येथे ११०, चिपळूण १०० मिलिमीटर, तर सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदूरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरही पावसाला सुरवात झाली आहे. डुंगरवाडी येथे ८० मिलिमीटर तर कोयना पोफळी येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  

Heavy Rain
खरिपात मूग, उडदाचे बियाणे बदलाचे प्रमाण अजूनही अल्प

मराठवाड्यातील परभणी, जालना, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. परभणीतील धालेगाव येथे ७० मिलिमीटर, तर जालन्यातील मंथा येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातही अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. अकोल्यातील बाळापूर येथे ७० मिलिमीटर, बुलडाण्यातील शेगाव येथे ६० मिलिमीटर तर यवतमाळमधील डिग्रस येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : लांजा १२०, वाकवली ११०, चिपळूण, वेंगुर्ला प्रत्येकी १००, गुहागर, कणकवली, मंडणगड प्रत्येकी ९०, मुलदे ८०, संगमेश्वर, महाड, रामेश्वर प्रत्येकी ७०, राजापूर, दापोली प्रत्येकी ६०, रोहा, तळा, सावंतवाडी, कुडाळ, हर्णे प्रत्येकी ५०, रत्नागिरी, माणगाव, दोडामार्ग, पोलादपूर, खेड, वैभववाडी प्रत्येकी ४०.

मध्य महाराष्ट्र : गिधाडे, मालेगाव प्रत्येकी ८०, महाबळेश्वर, नंदूरबार प्रत्येकी ७०, राहाता, भडगाव प्रत्येकी ६०, शिरपूर, गगनबावडा, सिंदखेडा, सटाणा, पारोळा प्रत्येकी ५०, धुळे, पाचोरा प्रत्येकी ४०, श्रीरामपूर, एरंडोल, गिरणा धरण, जावळीमेढा प्रत्येकी ३०.

मराठवाडा : धालेगाव ७०, मंथा ६०, परतूर, अहमदपूर, लोहा, वैजापूर प्रत्येकी ५०, धर्माबाद प्रत्येकी ४०, पालम, पाथरी, फुलंब्री, सोयगाव, मुदखेड, सोनपेठ, अंबाजोगाई प्रत्येकी ३०.

विदर्भ : बाळापूर ७०, शेगाव ६०, डिग्रस ५०, बुलडाणा, पवनी प्रत्येकी ४०, चांदूर बाजार, मंगरूळपीर, मेहकर, भिवापूर, समुद्रपूर प्रत्येकी ३०.

घाटमाथा : डुंगरवाडी ८०, कोयना पोफळी ७०, अंबोणे ६०, भिरा, शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी ५०, दावडी ४०, कोयना नवजा ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com